राज्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज ,अलर्ट जारी 

rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन  : महाराष्ट्रात आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज  हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाची तीव्रता आता कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रात झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट  तर 10 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पावसामुळे नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहतायत तर सोयाबीन, तूर ,उडीद , कापूस ,कांदा अशा शेती पिकांचे मात्र अतोनात नुकसान झाले आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे 28 सप्टेंबर 2021 ते 1 ऑक्टोबर 2021 या कालावधीत कोकण किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये तसेच या कालावधीत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

या कालावधीत कोकण किनारपट्टीच्या भागात 40-45 ते 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच समुद्र किनारपट्टीच्या भागातील गावांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या जिल्ह्यांना अलर्ट जारी 

पालघर,ठाणे,रायगड,रत्नागिरी,नाशिक,धुळे, जळगाव या 7 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जरी करण्यात आला आहे. तर मुंबई,सिंधुदुर्ग,नंदुरबार,पुणे,अहमदनगर,औरंगाबाद,जालना,बीड,परभणी,हिंगोली या 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आला आहे.

आज 28 सप्टेंबर रोजी कोकण विभागात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताआहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र विभागात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता,तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे  मराठवाडा विभागात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. तर विदर्भ विभागात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता,तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता,तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.