सोयाबीन बाजारात आशादायी वातावरण ; दर 7 हजारांच्या वर ; पहा आजचा बाजारभाव

Soybean Bajar Bhav Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागील आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात वाढ झाल्यामुळे सोयाबीन बाजारात आशादायी चित्र दिसत आहे. सध्या सोयाबीनचे कमाल बाजारभाव सात हजारांच्या वर गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मागील चार महिन्यानंतर हांगामाच्या शेवटच्या टप्प्यात सोयाबीनचे दर वाढणे हे शेतकऱ्यांसाठी सुखद धक्क्यासारखे आहे.

शेतकऱ्यांनी काय करावे ?
वाढीव दराच्या प्रतिक्षेत गेल्या चार महिन्यांपासून सोयाबीनची साठवणूक करण्यात आली आहे. थोड्याबहुत प्रमाणात दर वाढले तर लागलीच गरजेनुसार विक्री हे धोरण शेतकऱ्यांनी ठरवले होते. आता ब्राझिल आणि चीनमध्येही सोयाबीनची उत्पादकता घटलेली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनची मागणी वाढली आहे. भविष्यात दर वाढतील. विक्रमी दराचा लाभ घ्यावयाचा असेल तर शेतकऱ्यांना अणखीन काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला माहिती देताना सांगितले आहे.

दरम्यान आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार सोयाबीनला सर्वाधिक बाजार भाव ७१85 इतका प्रतिक्विंटल साठी मिळाला आहे. हा भाव परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून आज परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १२50 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव 6550, कमाल सात हजार 185 आणि सर्वसाधारण भाव सहा हजार 701 रुपये मिळाला आहे. या खालोखाल मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती इथं सात हजार शंभर, त्यानंतर दिग्रज कृषी उत्पन्न बाजार समितीत सात हजार 155 ,तर गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत सात हजार असा सोयाबीनला प्रति क्विंटल साठी कमाल भाव मिळाला आहे. तर सोयाबीनचे सर्वसाधारण भाव हे पाच हजार रुपये ते सहा हजार आठशे रुपयांपर्यंत आहेत. तर आज सर्वाधिक आवक ही लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली असून ही आवक तेरा हजार 291 क्विंटल इतकी झाली आहे. तर आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किमान भाव 6500 कमाल भाव 6970 सर्वसाधारण भाव 6750 इतका मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 22-2-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/02/2022
माजलगावक्विंटल1068550167616500
उदगीरक्विंटल5400675068506800
कारंजाक्विंटल4500595067006375
परळी-वैजनाथक्विंटल1250655071856701
सेलुक्विंटल402590067006500
तुळजापूरक्विंटल185650067506600
राहताक्विंटल20650067606630
सोलापूरलोकलक्विंटल319640067706690
नागपूरलोकलक्विंटल430550067506438
अमळनेरलोकलक्विंटल9650066006600
हिंगोलीलोकलक्विंटल825515068556502
मेहकरलोकलक्विंटल1230580071006500
लातूरपिवळाक्विंटल13291650069006750
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल54660068516800
अकोलापिवळाक्विंटल1728562567606600
यवतमाळपिवळाक्विंटल653600067906395
मालेगावपिवळाक्विंटल9580166616610
चोपडापिवळाक्विंटल40667566996699
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल15640065006450
भोकरपिवळाक्विंटल104571366256170
जिंतूरपिवळाक्विंटल310615168006200
दिग्रसपिवळाक्विंटल425650071556865
गेवराईपिवळाक्विंटल166600063506350
परतूरपिवळाक्विंटल84623267006630
गंगाखेडपिवळाक्विंटल40670070006700
चांदूर बझारपिवळाक्विंटल189600065006440
गंगापूरपिवळाक्विंटल4630063006300
आंबेजोबाईपिवळाक्विंटल450630069406800
चांदूर-रल्वे.पिवळाक्विंटल185650068106700
उमरखेडपिवळाक्विंटल210580060005900
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल500580060005900
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल148420068005900
आर्णीपिवळाक्विंटल520600067406400