हुश्श…! राज्यात पावसाची उघडीप, पहा पुढील ५ दिवसांसाठी काय आहे हवामानाचा अंदाज

Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून कोकणसह मध्य महाराष्ट्रात पावसाने अक्षरशः कहर केला आहे. राज्यातील अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी दरडी देखील कोसळत मोठी जीवित हानी देखील झाली आहे. भारतीय हवामान खात्याने मात्र आता एक दिलासादायक माहिती दिली आहे. मागील काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा पाऊस आता उसंत घेईल असा अंदाज मुंबई वेधशाळेने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात पाऊस कमी होईल असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. दरम्यान कोणत्याही जिल्ह्याला आता रेड अलर्ट दिलेला नाही त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजमुळे नागरिकांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे.

आज कसे असेल हवामान

मुंबई वेधशाळेनं रायगड, रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला. तर ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव औरंगाबाद, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केलाय.

25 जुलै

उद्या म्हणजेच 25 जुलै साठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्याला हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

26जुलै
तर सोमवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 27, 28 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा ना अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार काहीसा दिलासा आता मुसळधार पाऊस पडणाऱ्या या भागांना मिळणार आहे.

कोल्हापुरातही उघडीप
2019 साली महाभयंकर अशा पुराने कोल्हापूर जिल्ह्याला झोडपलं होतं. आता तशीच काहीशी परिस्थिती निर्माण होईल की काय अशी भीती कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांना वाटत होती. मात्र आता आज पावसाने उघडीप दिल्यानं काहीसा दिलासा येथील नागरिकांना मिळाला आहे. दरम्यान पंचगंगा आणि इतर नद्यांची पाण्याची पातळी पाहता आर्मीचे एक युनिट कोल्हापूर जिल्ह्यात पाचारण करण्यात आले आहे. 65 जवानांची तुकडी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ भागात काम करणार आहे. जिल्ह्यातील पूरस्थिती हाताळण्यासाठी आर्मीचे जवान सज्ज झाले आहेत. कोल्हापूर विमानतळावर एनडीआरएफ आणि त्यांची एक टीम दाखल झाली असून कोल्हापूर सांगली आणि पुणे जिल्ह्यासाठी किती काम करणार आहे. जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत घट होत असली तरी खबरदारी म्हणून प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे.