हॅलो कृषी ऑनलाईन: नाशिक (Nashik) जिल्ह्यात कांदा खरेदी (Onion Purchase) नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) या संस्थांच्या माध्यमातून ठरवलेल्या भावानुसार करत असते. नाशिक जिल्ह्यात मागील काही महिन्यात पाच लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक कांदा खरेदी (Onion Purchase) करण्यात आला. मात्र यात शासनाच्या या दोन्ही संस्थांनी घोळ केल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे, मात्र हा घोळ समोर आणण्यासाठी ठोस पुरावेच नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
नेमकं खरेदीच्या वेळेस काय होतं?
एका शेतकर्याशी (Farmers Opinion) बोलताना समजलं की ज्या वेळेस नाफेड किंवा एनसीसीएफ कांदे खरेदी (Onion Purchase) करत असते. त्यावेळी कांदा उत्पादक शेतकर्याकडे स्वत:चा सातबारा ज्यावर कांदा पिकाची नोंदणी असेल, त्याच बरोबर आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक अशी आवश्यक कागदपत्रे दाखवावे लागतात. ज्यावेळी शेतकरी कांदा विक्रीसाठी या संस्थांकडे जातो. त्यावेळी या संस्थांच्या माध्यमातून कांद्याची तपासणी केली जाते. त्यानंतर या कांद्याचा भाव (Onion Rate) ठरवला जातो. त्यानंतर नाफेडने ठरवलेला भाव आणि प्रत्यक्षात देत असलेला भाव यात तफावत दिसून येते.
म्हणजेच नाफेडचा आणि एनसीसीएफचा हमीभाव (Onion MSP) हा 2200 पर्यंत होता. मात्र शेतकर्यांना कधी 1800 तर कधी 1900 असा क्विंटल मागे भाव दिल्याचे शेतकर्यांनी सांगितलं, मग अशावेळी दुसरीकडे बाजार समितीमध्ये कांद्याला 1200 आणि 1300 रुपये भाव मिळत असतो. त्यामुळे शेतकरी अधिक पैसे मिळतील म्हणून नाफेड आणि एनसीसीएफ सारख्या संस्थांना कांदा विक्री करतो. माल विक्री केल्यानंतर संबंधित संस्था शेतकर्यांना ठरवलेल्या भावानुसार रोख स्वरुपात पैसे देते. त्यानंतर संबंधित संस्था आपल्या पोर्टलवर मात्र जो हमीभाव आहे त्या हमीभावानुसार कांदा खरेदी झाल्याचे नमूद करते. आणि यात केवळ शेतकर्यांना नुकसान सहन करावे लागते.
शेतकरी संघटनांचे नेमकं म्हणणं काय आहे?
नाफेड व एनसीसीएफच्या मार्फत हा कांदा कोणाकडून घेतला याची तपासणी व्हावी. ज्या शेतकर्यांनी कांदा विक्री केला? कोणत्या दिवशी दिला त्या दिवशी काय भाव होते आणि त्या शेतकर्याला तो भाव मिळाला का? याची पण चौकशी व्हावी. तसेच ज्या ज्या दिवशी भाव ठरतात, त्या त्या दिवशी त्या शेतकर्यांना भाव मिळाला का? काही कांदा नाही दिला तरी प्रत्यक्षात दिल्याचे दाखवतात, ते तपासावे, तसेच कांदा खरेदीसाठी साधारणपणे दैनंदिन दर हे त्याच दिवशी येत असतात. परंतु कांदा उत्पादक शेतकर्यांना दर दिवसाचा भाव काय आहे हेही माहित नसते. हे सगळे प्रश्न उपस्थित होतात.
त्यामुळे बाजार समितीत (Bajar Samiti) जाऊन प्रत्यक्ष बोली लावून संस्थांनी कांदा खरेदी (Onion Purchase) केला पाहिजे, तेव्हाच त्यात पारदर्शकता राहील असे शेतकर्यांचे म्हणणे आहे.