हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी (Kanda Bajar Bhav) उठवली असली तरी त्याचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा होताना दिसत नाहीये. राज्यात पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल कांद्याला बाजार भाव मिळण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा असताना, आता लोकसभा निवडणूकीनंतर राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. कांद्याला राज्यात सरासरी प्रतिक्विंटल 1000 ते 1100 पर्यंत दर (Kanda Bajar Bhav) मिळत आहे.
आजचे राज्यातील कांदा बाजारभाव (Kanda Bajar Bhav Today 22 May 2024)
लासलगाव – विंचूर बाजार समितीत आज कांद्याची 7200 क्विंटल आवक (Kanda Bajar Bhav) झाली असून, कमाल 1952 ते किमान 700 रुपये तर सरासरी 1650 रुपये प्रति क्विंटल, पिंपळगाव बसवंत बाजार समितीत आज कांद्याची 30000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2196 ते किमान 400 रुपये तर सरासरी 1700 रुपये प्रति क्विंटल, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत आज कांद्याची 1782 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1600 ते किमान 300 रुपये तर सरासरी 950 रुपये प्रति क्विंटल, चांदवड बाजार समितीत आज कांद्याची 4200 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2035 ते किमान 635 रुपये तर सरासरी 1550 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
येवला बाजार समितीत आज कांद्याची 4000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1757 ते किमान 500 रुपये तर सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटल, मंगळवेढा बाजार समितीत आज कांद्याची 171 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2000 ते किमान 300 रुपये तर सरासरी 1200 रुपये प्रति क्विंटल, अकलुज बाजार समितीत आज कांद्याची 380 क्विंटल आवक झाली असून, कमाल 1800 ते किमान 300 रुपये तर सरासरी 1000 रुपये प्रति क्विंटल, मुंबई बाजार समितीत आज कांद्याची 9770 क्विंटल आवक झाली असून, कमाल 2100 ते किमान 1500 रुपये तर सरासरी 1800 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
संपूर्णपणे निर्यातबंदी उठवण्याची मागणी
गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज (22 मे 2024) 200 ते 300 रुपयाने कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली. सध्या शेतकऱ्यांना मिळत असलेल्या कांदा दरात उत्पादन खर्च ही निघणे मुश्किल झाले आहे. तसेच दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणी विकत घेत टँकरने पाणी देत कांद्याचे पिक घेतले एकरी एक लाख ते सव्वालाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे. त्यामुळे अटी, शर्ती न लावता संपूर्ण कांद्याची निर्यातबंदी हटवण्याची मागणी शेतकरी करत आहे.