Kharif Season : परभणी कृषी विद्यापीठाची बियाणे विक्री 18 मेपासून सुरु होणार!

Kharif Season Seeds Rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : वसंतराव नाईक मराठवाडा (Kharif Season) कृषि विद्यापीठाच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शनीचे आयोजन शनिवारी (ता.18) सकाळी 11 वाजता कृषि महाविद्यालय परभणी येथील सभागृहात करण्यात आले आहे. या कार्यक्रमावेळी विद्यापीठाकडून यंदाच्या खरीप हंगामासाठीची (Kharif Season) बियाणे विक्री सुरु केली जाणार आहे. याशिवाय शनिवारी विद्यापीठ विकसित तंत्रज्ञान तसेच कंपन्याच्या आणि बचतगटाचे साहित्याचे कृषि प्रदर्शनीचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

विद्यापीठाचे बियाणे आणि त्याचे दर (Kharif Season Seeds Rate)

तूर : तुरीचे बीडीएन-७१६ (लाल), बीडीएन-७११ (पांढरी), ६ किलोच्या बॅगमध्ये तर बीडीएन-१३-४१ गोदावरी (पांढरी) हे वाण ६ आणि २ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून प्रती किलो दर २५० दराने उपलब्ध आहे. या बियाण्याची उपलब्धता बीडीएन-७१६ (८०० बॅग), बीडीएन-७११-(३६६ बॅग), बीडीएन-१३-४१ गोदावरी ६ किलोच्या ७०० बॅग व २ किलोच्या ३०० बॅग अशी आहे.

सोयाबीन : सोयाबीनचे एमएयुएस-१६२, एमएयुएस-१५८, एमएयुएस-७१, एमएयुएस-६१२ हे वाण २६ किलोच्या बॅगमध्ये तर एमएयुएस-७२५ हा वाण ५ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून, सर्व वाणाचा प्रती किलो दर हा १०० रुपये इतका आहे. याची बियाण्याची उपलब्धता एमएयुएस-१६२ (१००० बॅग), एमएयुएस-१५८ (१५०० बॅग), एमएयुएस-७१ (१७५ बॅग), एमएयुएस-६१२ (१००० बॅग) आणि एमएयुएस-७२५ (१६०० बॅग) अशी आहे.

ज्वारी : ज्वारीचा परभणी शक्ती हा वाण ४ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून, या वाणाचा प्रती किलो दर १२५ रुपये इतका आहे. या वाणाच्या ३०० बॅगची उपलब्धता आहे.

मुग : मुगाचा बीएम-२००३-२ हा वाण ६ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून, या वाणाचा प्रती किलो दर २२० रुपये इतका आहे. या वाणाच्या २१६ बॅगची उपलब्धता आहे.

कुठून कराल बियाणे खरेदी?

बियाणे खरेदीसाठी रोख रक्कम स्विकारण्यात येईल. तसेच एका व्यक्तीस एक बियाणे बॅग याप्रमाणे विक्री करण्यात येईल..या परिसंवादाचे थेट प्रक्षेपण https://www.youtube.com/@VNMKV विद्यापीठ युटयुब चॅनेलवर करण्यात येणार आहे. तरी परिसंवादाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.