हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात मका पिकाची लागवड (Maize Variety) केली जाते. मात्र, मका पिकातून चांगले विक्रमी उत्पादन मिळवायचे असेल तर मकाच्या सुधारित वाणांची लागवड करणे गरजेचे आहे. अशातच हवामान विभागाने देखील यंदा राज्यात वरुणराजा चांगला बरसणार असल्याचे भाकीत केले आहे. ज्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, अनेकजण शेतीच्या बियाण्यांची चौकशी करताना आढळून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण मका पिकाच्या सुधारित जातींची (Maize Variety) माहिती जाणून घेणार आहोत.
‘या’ आहे मकाच्या सुधारित जाती (Maize Variety For Farmers)
पुसा संकरित मका १ : पावसाळी हंगामात ‘पुसा संकरित मका १’ या जातीच्या मकाची (Maize Variety) लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. मकाचे हे वाण लवकर हार्वेस्टिंगसाठी तयार होते. प्रामुख्याने 70 ते 80 दिवसात हे वाण काढणीला येते. या वाणापासून हेक्टरी 40 ते 50 क्विंटल मका उत्पादन मिळते.
विवेक संकरित मका २१ : ‘विवेक संकरित मका २१’ या जातीची देखील पावसाळ्यात लागवड केली जाऊ शकते. 70 ते 80 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होते. तसेच या जातीपासून 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टर इतके उत्पादन मिळते.
विवेक संकरित मका २७ : ‘विवेक संकरित मका २७’ हे देखील मकाचे लवकर हार्वेस्टिंगसाठी तयार होणारे वाण आहे. या जातीचे पीक 80 ते 90 दिवसात हार्वेस्टिंगसाठी तयार होते. तसेच त्यापासून हेक्टरी 50 ते 55 क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळते.
महाराजा : महाराजा या जातीची मका देखील लवकर हार्वेस्टिंगसाठी तयार होते. या जातीचे पीक सरासरी 80 ते 90 दिवसात हार्वेस्टिंगसाठी तयार होते. तसेच त्यापासून हेक्टरी 60 ते 65 क्विंटल इतके दर्जेदार उत्पादन मिळते.
राजर्षी : मकाचे हे मध्यम कालावधीत हार्वेस्टिंगसाठी तयार होणारे वाण आहे. या जातीचे पीक सरासरी 90 ते 100 दिवसात परिपक्व होते. तसेच या जातीपासून हेक्टरी ७० ते ७५ क्विंटल इतके दर्जेदार उत्पादन मिळते.
फुले महर्षी : फुले महर्षी या जातीचे मका पीक 90 ते 100 दिवसात काढण्यासाठी तयार होते. तसेच या वाणाच्या मदतीने एका हेक्टरमध्ये 75 ते 80 क्विंटल पर्यंत मका उत्पादन मिळते.
बायो-९६३७ : मकाची ही देखील जात मध्यम कालावधीत हार्वेस्टिंगसाठी तयार होणारी जात आहे. या जातीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी 70 ते 75 क्विंटल इतके उत्पादन मिळते. या वाणाचा पीक परीपक्व कालावधी हा 90 ते 100 दिवसांचा असून, महाराष्ट्रात लागवडीसाठी हे वाण अत्यंत उपयुक्त आहे.