राज्यात किमान आणि कमाल तापमानातील चढ -उतार कायम …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या पहाटे गारवा आणि दिवसभर उन्हाचा चटका अनुभवायला मिळतो आहे. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ३० अंशांच्या वर गेले आहे. पुण्यातही सोमवारी दिनांक ७ रोजी पारा ३० अंशांवर गेला. राज्यामध्ये किमनं आणि कमाल तापमानातील चढ- उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

राज्यात उन्हाचा चटका वाढत असताना तिकडे उत्तर भारतात मात्र 08 आणि 09 फेब्रुवारी 2022 च्या रात्री पश्चिम हिमालयीन प्रदेशात (जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये) गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह बर्‍याच प्रमाणात हलका/मध्यम पाऊस/बर्फवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. याबरोबरच 09 फेब्रुवारी रोजी पंजाब, हरियाणा-चंडीगड-दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानमध्ये गडगडाटी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 09 फेब्रुवारी रोजी पश्चिम उत्तर प्रदेशात अचानक गारपीट होण्याची शक्यता आहे. अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

दरम्यान मध्य महाराष्ट्र ,उत्तरेकडील थोडा भाग आणि विदर्भातही किमान तापमान थोडे खाली सरकलेले पाहायला मिळत आहे. आज दिनांक 8 रोजी जळगाव येथे 11 डिग्री सेल्सियस, मालेगाव येथे 12 डिग्री सेल्सियस, महाबळेश्वर 14.5, नाशिक 13.3, बारामती 15.3, पुणे 14.8, माथेरान 13.8 आणि चिकलठाणा 13.6, नागपूर 13.5, अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.