हुश्श ..! मान्सून आज परतीच्या प्रवासावर ; राज्यात आज ‘या’ भागात पाऊस

rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. काही ठिकणी इतका पाऊस झाला आहे की शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अखेर मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या वायव्य भारतातून माघारी परतण्याचा पोषक स्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण देशाला पाऊस देणारा मान्सून आजपासून परतीच्या प्रवासावर निघण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. सर्वसाधारण वेळेपेक्षा काहीशा उशिराने संपूर्ण देशात पोहोचलेल्या मान्सूनच्या परतीचा मुहूर्तही लांबला आहे.

मान्सूनचे आगमन आणि परतीच्या वेळी ठरवण्यासाठी गेल्या वर्षीपासून हवामान विभागाने नवीन वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार 17 सप्टेंबर ही मान्सूनचा राजस्थानातून परतीची नवीन सर्वसाधारण तारीख निश्चित करण्यात आलिया आहे. या पूर्वी राजस्थानातून माघारीची तारीख 1 सप्टेंबर ठेवण्यात आली होती. मान्सूनची संपूर्ण देशातील परतीची सर्वसाधारण कार्यक्रम 15 ऑक्टोबर आहे.

या वर्षीचा मान्सून चा विचार करता अनियमित दीर्घकालीन वेळेच्या दोन दिवस उशिराने मान्सून केरळमध्ये दाखल झालेला मान्सून केरळमध्ये तीन जून रोजी दाखल झाला. केरळात दाखल होताच मान्सून एक्स्प्रेसचा प्रवास सुसाट गतीने सुरू झाला. अरबी समुद्रातून वेगानं प्रवास करत मान्सून दोनच दिवसात महाराष्ट्रात म्हणजे पाच जूनला पोहोचला. मान्सूनने यंदा पाच दिवसातच (10 जून) संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता. अरबी समुद्रात आलेले शाहीन चक्रीवादळ ओमान कडे गेल्यानंतर भारताच्या काही भागातून मोसमी वारे माघारी परतण्यासाठी अनुकूल हवामान झाले आहे. आज दिनांक सहा पासून मान्सून परतीच्या प्रवासावर निघणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

आज या भागात पाऊस

हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे याभागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. आशिया महिपती हवामान विभागाकडून दिली आहे. या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.