हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशभरातील शेतकरी चातकासारखी मॉन्सूनच्या पावसाची वाट (Monsoon Update) पाहत आहेत. अशातच आता मॉन्सून दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून, मॉन्सूनच्या प्रवासाने वेग घेतला आहे. ज्यामुळे पुढील पाच दिवसांमध्ये मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. असे भारतीय हवामानशास्र विभागाने म्हटले आहे. ज्यामुळे आता मॉन्सूनने वेग (Monsoon Update) पकडल्याने राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अनुकूल परिस्थिती निर्माण (Monsoon Update Today 27 May 2024)
हवामान विभागाने देशातील आघाडीच्या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, आगामी पाच दिवसांमध्ये केरळमध्ये मॉन्सून दाखल होण्यास अनुकूलता निर्माण झाली असून, मॉन्सूनने आपल्या प्रवासाचा वेग वाढवला आहे. दरम्यान, याआधीच १९ मे २०२४ रोजी मॉन्सून अंदमान-निकोबार बेटांसह भारताच्या वेशीवर आला असल्याचे हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. याबाबत माहिती देतानाच हवामान विभागाने मे महिन्याच्या शेवटी नैऋत्य मॉन्सूनचा पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार आता पुढील पाच दिवसांमध्ये मॉन्सूनचा पाऊस केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातही वेळेत दाखल होणार?
प्रामुख्याने, दरवर्षी मॉन्सून १ जूनला केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र, यावर्षी मॉन्सूनच्या वेगाने प्रवासासाठी काहीशी अनुकूल परिस्थिती निर्माण, त्याआधीच मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. परिणामस्वरूप, महाराष्ट्रात दाखल होण्याची मॉन्सून तारीख देखील आधीच येण्याची शक्यता असून, वेळेआधीच मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो. असा अंदाजही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर 10 ते 11 जूनपर्यंत मुंबईत मॉन्सूनचे आगमन होण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.
सुधारित अंदाज लवकरच
दरम्यान, राज्यात सध्या विविध ठिकाणी मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. यंदा मॉन्सूनचा पाऊस सामान्य राहणार असून, सरासरीच्या 106 टक्के मॉन्सूनचा होईल, असे भारतीय हवामानशास्र विभागाने आपल्या प्राथमिक अंदाजात अलीकडेच म्हटले आहे. त्यानंतर आता हवामान विभागाकडून मी महिन्याच्या अखेरीस लवकरच यंदाच्या मॉन्सूनच्या पावसाबाबतचा सुधारित आणि अंतिम अंदाज व्यक्त केला जाण्याची शक्यता आहे. ज्यात यंदाच्या पावसाळ्याचे अंतिम स्वरूप स्पष्ट होणार आहे.