Onion Rate: कसे आहेत राज्यातील प्रमुख बाजार समित्यांतील कांद्याचे भाव?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: या आठवड्याचे एनसीसीएफ आणि नाफेडचा कांदा खरेदी दर (Onion Rate) जाहीर झाला असून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी तो समान म्हणजेच 2880 रुपये इतका आहे. आज सोमवार दिनांक 1 जुलै पासून रविवार पर्यंत म्हणजेच 7 जुलैपर्यंत हाच खरेदी दर (Onion Rate) राज्यात असेल.

दरम्यान मागच्या आठवड्याच्या तुलनेत लासलगाव (Lasalgaon) आणि पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Basavant) बाजार समितीतील कांद्याचे बाजार भाव आज किंचितसे वाढलेले दिसून आले. मागच्या आठवड्यात लासलगाव बाजार समितीत (Bajar Samiti) कांद्याला सरासरी बाजारभाव (Onion Rate) 2900 रुपये प्रति क्विंटल असे होते. या आठवड्यात पहिल्याच दिवशी ते सरासरी 3 हजारापर्यंत आले आहेत. म्हणजे साधारणतः 50 ते 100 रूपयांनी वधारल्याचे दिसून आले.

आज लासलगाव-विंचूर उप बाजार समितीत सकाळच्या सत्रात कांद्याची 6 हजार 500 क्विंटल आवक झाली. उन्हाळी कांद्याला कमीत कमी बाजारभाव (Onion Rate) 1200, तर सरासरी 3 हजार रुपये प्रति क्विंटल असे होते.

पिंपळगाव बसवंत बाजार समितीत आज उन्हाळी कांद्याची 14 हजार 400 क्विंटल आवक झाली. सरासरी बाजारभाव 3100 रुपये प्रति क्विंटल असे राहले.

असे असले तर जिल्ह्यातील येवला, मनमाड चांदवड बाजार समित्यांमध्ये लासलगाव-पिंपळगावपेक्षा कमी बाजारभाव राहले.

लासलगाव बाजार समितीत नाफेड(NAFED)-एनसीसीएफने(NCCF) जाहीर केलेल्या बाजार भावापेक्षा सरासरी बाजारभाव जास्त राहिले, तर इतर बाजार समित्यांमध्ये कमी राहिले.

राज्यातील प्रमुख बाजारांतील कांदा बाजारभाव (रू./ क्विंटल) (Onion Rate)

बाजार समितीजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/07/2024
कोल्हापूर2139100033002200
मुंबई – कांदा बटाटा मार्केट8172240032002800
सातारा45250030002750
कराडहालवा99100030003000
बारामतीलाल45667028002100
जळगावलाल74677728151790
नागपूरलाल2220200030002750
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकल349280032003000
सांगली – फळे भाजीपालालोकल1566100032002100
पुणेलोकल2513100030002000
पुणे-मोशीलोकल417140025001950
चाळीसगाव- नागदरोडलोकल1400255029512700
वाईलोकल350150029002400
मंगळवेढालोकल146121030202820
कामठीलोकल7300040003500
कल्याणनं. १3250028002650
नागपूरपांढरा1000270032003075
येवलाउन्हाळी5000150030162750
येवला -आंदरसूलउन्हाळी3000147530602700
लासलगाव – विंचूरउन्हाळी6500120032003000
मालेगाव-मुंगसेउन्हाळी10000100032012950
सिन्नर – नायगावउन्हाळी557100031913000
कळवणउन्हाळी1330090032552750
चांदवडउन्हाळी5000170130012250
मनमाडउन्हाळी1000130029522700
पिंपळगाव बसवंतउन्हाळी14400100034003100
दिंडोरीउन्हाळी285250031602900
दिंडोरी-वणीउन्हाळी4544270034503065
वैजापूरउन्हाळी76090031002500
देवळाउन्हाळी515592532053025
Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.