हॅलो कृषी ऑनलाईन : केरळ-तामिळनाडूपर्यंत पोहचलेला मॉन्सून या आठवड्यात महाराष्ट्रात (Soyabean Variety) दाखल होणार आहे. ज्यामुळे सध्या शेतकऱ्यांची शेतीच्या कामांची मोठी लगबग सुरु आहे. अनेक जण सोयाबीन, कापूस अशा विविध पिकांच्या पेरणीसाठी मॉन्सून वाट पाहत आहेत. त्यामुळे आता तुम्हीही यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन लागवडीच्या तयारीत असाल तर आज आपण सोयाबीनच्या सुधारित जातींची माहिती पाहणार आहोत. विशेष म्हणजे सोयाबीनच्या या तीनही प्रजाती (Soyabean Variety) तीन महिन्यांच्या कालावधीतच शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकणार आहे.
सोयाबीनच्या सुधारित जाती (Soyabean Variety For Farmers)
जेस-2069 : सोयाबीनची ही एक सुधारित जात (Soyabean Variety) आहे. लवकर हार्वेस्टिंग साठी तयार होणारा हा वाण शेतकऱ्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे कमी कालावधीत तयार होणारे वाण असतानाही यापासून चांगले उत्पादन मिळत आहे. पेरणीनंतर अवघ्या 85 ते 90 दिवसांनी या जातीचे पीक काढणीला येते. या जातीच्या पेरणीसाठी एकरी ४० किलो बियाणे लागते. या जातीपासून हेक्टरी 22-26 क्विंटल उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.
एनआरसी 181 : ही देखील सोयाबीनची एक प्रमुख जात आहे. देशातील प्रमुख सोयाबीन उत्पादक पट्ट्यात या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. ही जात उच्च उत्पन्न देणारी जात मानली जाते. ही जात येलो मोझॅक आणि टार्गेट लीफ स्पॉट या रोगांना प्रतिरोधक असल्याचे आढळले आहे. भारतातील मैदानी प्रदेशात या जातीची प्रामुख्याने शेती केली जात आहे. या जातीचा पीक परीपक्व कालावधी हा 90 ते 95 दिवसांचा आहे. ही जात हेक्टरी 16 ते 17 क्विंटल पर्यंतचे उत्पादन देते.
बीएस ६१२४ : भारतातील प्रमुख सोयाबीन उत्पादक पट्ट्यात या जातीची देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या जातीची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. पीक पेरणीनंतर सरासरी 90 ते 95 दिवसात शेतकऱ्यांना या जातीपासून उत्पादन मिळते. हेक्टरी 20 ते 25 क्विंटल एवढे उत्पादन या जातीपासून मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. या जातीला जांभळ्या रंगाची फुले येतात.