हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याचे सोयाबीन मार्केट पाहता ते अस्थिर असल्याचे दिसून येते आहे. शेतकऱ्यांनी मात्र, दोन्हीबाजूंनी सुरक्षित राहण्यासाठी टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करण्याचा सल्ला कृषितज्ञांनी दिला आहे. मध्यंतरी सोयापेंड आयातीची चर्चा सुरु असतनादेखील सोयाबीनच्या दरात वाढ होत होती. पण आता हा निर्णय केंद्र सरकारने माघारी घेतला असताना देखील त्याचा परिणाम हा दरवाढीवर होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता योग्य निर्णय घेतला तरच फायद्याचे राहणार आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होणार हा शेतकऱ्यांना विश्वास होता. पण आता बाजारातील चित्र पाहून शेतकरी हे हवालदिल झाले आहेत. कारण सर्वकाही पोषक असताना जर सोयाबीनचे दर वाढत नसतील तर उद्या उन्हाळी सोयाबीन बाजारात दाखल झाल्यावर साठवलेल्या सोयाबीनचे काय हा प्रश्न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा भर विक्रीवर आहे. पण शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने विक्री केली तर फायदा होणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.
राज्यातील ३ बाजारपेठेत सोयाबीनला ७ हजार अधिक भाव
राज्यातील विविध बाजार समितीमधले आजचे सोयाबीन बाजार भाव पाहता आज मेहकर ,चिखली , अकोला बाजरा समितीमध्ये जास्तीत जास्त ७ हजार आणि त्यापेक्षा अधिक भाव मिळाला आहे. मेहकर ७१००,चिखली ७००१,तर सर्वाधिक अकोला येथे ७३९५ इतका कमाल भाव मिळाला आहे.
आजचे सोयाबीन बाजारभाव 16/12/2021
शेतमाल— जात/प्रत— परिमाण— आवक— कमीत कमी दर— जास्तीत जास्त दर— सर्वसाधारण दर
माजलगाव — क्विंटल 797 5000, 6325, 6150
परळी-वैजनाथ — क्विंटल 350 5701, 6351, 6200
मोर्शी — क्विंटल 510 5800, 6300, 6050
राहता — क्विंटल 31 6200 ,6341, 6275
धुळे हायब्रीड क्विंटल 6 4000, 6200, 6200
नागपूर लोकल क्विंटल 811 5000, 6321, 5991
हिंगोली लोकल क्विंटल 500 5800, 6200, 6000
मेहकर लोकल क्विंटल 800 5800, 6350, 6100
मेहकर नं. १ क्विंटल 28 6755, 7100, 6800
ताडकळस नं. १ क्विंटल 175 5825, 6200, 6000
लातूर पिवळा क्विंटल 5868 5700, 6890, 6440
लातूर -मुरुड पिवळा क्विंटल 44 6150, 6300, 6200
जालना पिवळा क्विंटल 1085 5425, 6200, 6050
अकोला पिवळा क्विंटल 2776 5540, 7395, 6500
चिखली पिवळा क्विंटल 626 6001, 7001, 6501
बीड पिवळा क्विंटल 136 5601, 6300, 6153
वाशीम पिवळा क्विंटल 6000 5500, 6711, 6150
भोकर पिवळा क्विंटल 113 5625, 6131, 5878
जिंतूर पिवळा क्विंटल 133 6150, 6450, 6250
मलकापूर पिवळा क्विंटल 318 5000, 6245, 5780
सावनेर पिवळा क्विंटल 11 5870, 6000, 5950
गंगाखेड पिवळा क्विंटल 38 6200, 6450, 6200
तेल्हारा पिवळा क्विंटल 175 5875, 6150, 6110
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 50 6000, 6200, 6200
धरणगाव पिवळा क्विंटल 17 5800, 6285, 6285
गंगापूर पिवळा क्विंटल 46 5600, 6050, 5887
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 60 5400, 6300, 6200
चाकूर पिवळा क्विंटल 100 6091, 6390, 6261
पांढरकवडा पिवळा क्विंटल 48 6100, 6295, 6250
उमरखेड पिवळा क्विंटल 290 5100 ,5300, 5200
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 360 5100, 5300, 5200
काटोल पिवळा क्विंटल 95 3900, 5931, 4780
पुलगाव पिवळा क्विंटल 63 5975, 6260, 6100
देवणी पिवळा क्विंटल 36 6300, 6470, 6385
बोरी पिवळा क्विंटल 26 6100 ,6295, 6155