आज सोयाबीनला मिळाला कमाल 7565 रुपये दर ; केवळ एका क्लिक वर पहा राज्यातील बाजार समित्यांमधील बाजारभाव

Soyabean Bajarbhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज २४-३-२२ सायंकाळी सात वाजून 30 मिनिटांनी पर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील मिळालेल्या बाजारभावानुसार आज देवणी कृषी उत्पन्न बाजार समिती इथं सोयाबीनला सर्वाधिक सात हजार 565 रुपये कमाल भाव मिळाला आहे. देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज पिवळ्या सोयाबीनची 80 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव सहा हजार शंभर रुपये, कमाल भाव 7565 रुपये तर सर्वसाधारण भाव सहा हजार 832 रुपये इतका मिळाला. त्या खालोखाल पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल 7300 रुपये, अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती कमाल सात हजार 355, जालना कृषी उत्पन्न बाजार समिती सात हजार चारशे आणि लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 7405 रुपये कमाल भाव सोयाबीन ला मिळाला आहे. आजच्या आवकेच्या बाबतीत बोलायचं झाल्यास आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक आवक झालेली दिसून येत आहे. आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची 12,275 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 7000, कमाल भाव 7405 आणि सर्वसाधारण भाव 7290 इतका मिळाला आहे. सोयाबीनचे सर्वसाधारण भाव हे सहा हजार आठशे रुपये ते सात हजार दोनशे रुपयांपर्यंत आहेत.

सोयाबीनला मिळणारा चांगला भाव बघता यंदाच्या वर्षी उन्हाळी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. शिवाय मुख्य पीक असलेल्या ज्वारी ऐवजी शेतकऱ्यांनी सोयाबीन या पिकाला पसंती दिली आहे. लवकरच बाजारांमध्ये उन्हाळी सोयाबीनची देखील आवक होईल पण मुख्यतः शेतकरी उन्हाळी सोयाबीन लागवड ही खरिपातील पिकांच्या बियाण्यांसाठी करतात.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 24-3-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/03/2022
औरंगाबादक्विंटल30540069006150
माजलगावक्विंटल169550070186800
राहूरी -वांबोरीक्विंटल32660170006800
उदगीरक्विंटल3000723072807255
कारंजाक्विंटल4000685073007025
लोहाक्विंटल23700072197190
मोर्शीक्विंटल201680071006950
राहताक्विंटल4716072117185
सोलापूरलोकलक्विंटल133670072257100
नागपूरलोकलक्विंटल200600073006175
हिंगोलीलोकलक्विंटल500685072727061
कोपरगावलोकलक्विंटल95510172327111
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल35643070016500
मेहकरलोकलक्विंटल790640073507000
घणसावंगीलोकलक्विंटल120670071007000
ताडकळसनं. १क्विंटल48700073007100
लातूरपिवळाक्विंटल12275700074057290
जालनापिवळाक्विंटल1957610074007200
अकोलापिवळाक्विंटल1461600073557000
यवतमाळपिवळाक्विंटल494600072506625
परभणीपिवळाक्विंटल105650071006900
चिखलीपिवळाक्विंटल273640070716735
बीडपिवळाक्विंटल166695471007044
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1205695072457125
मलकापूरपिवळाक्विंटल124570070906755
देउळगाव राजापिवळाक्विंटल6700070007000
उमरीपिवळाक्विंटल90710071307115
मुरुमपिवळाक्विंटल120640070946747
उमरगापिवळाक्विंटल5700071507100
सेनगावपिवळाक्विंटल470660072507000
पुर्णापिवळाक्विंटल20710073007237
पाथरीपिवळाक्विंटल10660069006850
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल70600063006200
काटोलपिवळाक्विंटल60560069616200
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल110600070006500
देवणीपिवळाक्विंटल80610075656832