हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडे ग्रामीण भागातील अनेक मुले आपल्या शिक्षणासोबतच शेतीमध्ये (Success Story) विशेष लक्ष देताना दिसून येत आहे. शाळा, कॉलेजच्या वेळेनंतर उर्वरित वेळेत काही मुले ही शेतामध्ये काम करून, मोठया प्रमाणात उत्पन्न देखील मिळवत आहे. त्याचबरोबर शिक्षण पूर्ण करण्याची महत्वाकांक्षा देखील लीलया पेलत आहे. आज आपण सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील अशाच एका तरुण शेतकऱ्याची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत.
10 एकरातून कोटीची कमाई (Success Story Of Young Farmer)
हा तरुण आपली 10 एकर डाळिंब शेती एकटा संभाळतो. मागील वर्षी या शेतकऱ्याने डाळिंब शेतीतून तब्बल 1 कोटी 20 लाखांची कमाई (Success Story) केली होती. त्यातच यंदा त्याचे दहावीचे वर्ष होते. दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये या तरुणाने 48.20 टक्के मिळवले आहे. त्यामुळे सध्या 10 एकर डाळिंब शेती सांभाळत दहावी पास होणाऱ्या या तरुणाची सर्वदूर चर्चा होत आहे. अभ्यासात जेमतेम असलेला मात्र दहावीत 48.20 टक्के मिळवून का होईना, पास झाला झाल्याने एक प्रगतशील बागायतदार म्हणून पंचक्रोशीत त्याची चर्चा होत आहे.
दहावीत असूनही शेतीकडे दुर्लक्ष नाही
प्रणव सूर्यवंशी (वय 16) असे या शेतकऱ्याचे नाव असून, तो आटपाडी तालुक्यातील खानजोडवाडी गावातील रहिवासी आहे. प्रणवला लहानपणापासूनच शेतीची आवड होती. त्याची सध्या घरी 10 एकरात डाळिंबाची शेती (Success Story) आहे. अगदी लहान असल्यापासून तो वडिलांना शेतीत मदत करत होता. यंदा दहावीचे वर्ष असूनही त्याने शेतीमध्ये पूर्णपणे झोकून दिलेले होते. त्याने शेतीकडे थोडेही दुर्लक्ष केले नाही आणि स्वतःहून सर्व कामे पाहिली. यामुळे त्याला शाळेसाठी वेळ मिळाला नाही आणि परीक्षेत कमी मार्क मिळाल्याचे तो म्हणतो.
ग्रामीण तरुणांसाठी प्रेरणादायी
मात्र, तरीही, प्रणवच्या यशाचा गावकऱ्यांना अभिमान आहे. गावातील मंडळींनी प्रणवच्या यशाचे स्वागत करत गावात मोठे फ्लेक्स लावले आहेत. प्रणव यांच्यासारख्या तरुणांमध्ये असलेली शेतीची आवड आणि कष्ट करण्याची वृत्ती प्रेरणादायी आहे. शिक्षणासोबतच कौशल्ये आणि व्यवहारज्ञान शिकणेही महत्त्वाचे आहे हे प्रणव याने दाखवून दिले आहे. प्रणवच्या शेतीसह शैक्षणिक यशामुळे अनेक पालकांना आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे. शिक्षणासोबतच आपल्या आवडीनिवडी आणि कौशल्यांवरही लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. असे प्रणव शेवटी आवर्जून सांगतो.