हॅलो कृषी ऑनलाईन : शेती व्यवसायात आता सुशिक्षित बेरोजगार तरुण आधुनिक पद्धतीने शेती (Success Story) करून,शेतीतून विक्रमी उत्पादन घेत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील शेतकरी दयानंद ज्ञानेश्वर ढोबळे आहे. विशेष म्हणजे ते एका हाताने दिव्यांग असून, त्यांनी 17 गुंठे क्षेत्रात भेंडीचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. या भेंडी लागवडीतून त्यांना सध्याच्या बाजारभावानुसार दीड ते दोन लाखांचा निव्वळ (Success Story) नफा होणार असल्याचे ते सांगतात.
आधुनिक पद्धतीचा अवलंब (Success Story Of Okra Farming)
पारगाव येथील ढोबळे मळ्यात दयानंद ज्ञानेश्वर ढोबळे या 26 वर्षीय तरुणाने आधुनिक तंत्रज्ञानाचा (Success Story) अवलंब करत, एका हाताने यशस्वी शेती करून दाखवली आहे. तरकारी पिकांना चांगले बाजारभाव मिळत असल्याने, त्यांनी भेंडीचे पीक घेण्याचे ठरवले. जमिनीची मशागत करून दीड महिन्यांपूर्वी 17 गुंठे क्षेत्रात गादी वाफे तयार करून त्यावर मल्चिंग पेपर अंथरून भेंडीचे बी टाकले पाण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर केला. दीड महिन्यानंतर सध्या त्यांच्या भेंडीच्या उत्पादनाला सुरुवात झाली आहे.
किती मिळतोय दर
बाजारात सध्या भेंडीला प्रती किलोला 35 ते 40 रुपये बाजारभाव मिळत आहे. एका तोड्याला 100 ते 120 किलो भेंडी निघत आहे. एक दिवसाआड भेंडीची तोडणी होत आहे. दोन महिने भेंडीचे उत्पादन सुरू राहणार आहे. दयानंद यांना भेंडीचे उत्पादन घेण्यासाठी त्याचे वडील ज्ञानेश्वर ढोबळे व आई निर्मला यांची मोठी मदत झाली आहे. भेंडीला सध्याचा असाच चांगला बाजारभाव मिळत राहिल्यास अंदाजे दोन लाख रुपयांपर्यंत निव्वळ उत्पन्न मिळेल असे, दयानंद ढोबळे यांनी सांंगितले आहे.
17 गुंठे भेंडीसाठी आलेला खर्च
जमिनीची मशागत बियाणे, मल्चिंग पेपर, ठिबक, खते, औषधे, मजुरी असा एकूण 45 हजार रुपये खर्च आला आहे. हा खर्च जाऊन अंदाजे दोन लाखांचा निव्वळ नफा हाती येण्याची आशा दयानंद ढोबळे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. पाण्याच्या तुटवड्यामुळे सर्वच प्रकारच्या भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे तरकारी मालाला चांगला बाजारभाव मिळत आहे. भेंडीलाही सध्या प्रतिकिलोला 40 ते 50 रुपये बाजारभाव मिळत आहे. एक दिवसाआड तोड होत आहे. आणखी दोन महिने आपले भेंडीचे उत्पादन सुरू राहणार आहे. सध्या दोन तोडे झाले आहेत. असेही शेतकरी दयानंद ढोबळे यांनी सांंगितले आहे.