Success Story : दीड एकरात आले लागवड; विक्रमी 350 क्विंटल उत्पादन, 30 लाख उत्पन्न!

Success Story Of Ginger Farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उच्च शिक्षण घेतल्यानंतर सध्या अनेक तरुण शेतीमध्ये पाऊल ठेवत (Success Story) आहे. विशेष म्हणजे शेती पिकांबाबत जास्तीची माहिती मिळवून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, हे तरुण शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळवत आहेत. इतकेच नाही तर बाजारपेठेचा आढावा घेतल्याने, त्यांनी लागवड केलेल्या पिकांना अधिकचा दर देखील मिळत आहे. परिणामी, त्यांना विक्रमी उत्पादन मिळण्यास मदत होत आहे. आज आपण अशाच एका तरुण शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी दीड एकरातील आले लागवडीतून विक्रमी ३० लाखांचे उत्पन्न (Success Story) मिळवले आहे.

शिक्षणानंतर धरली शेतीची वाट (Success Story Of Ginger Farming)

भारत पंढरीनाथ जाधव (वय 23 वर्ष) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, ते जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील बोरगाव बुद्रुक येथील रहिवासी आहेत. शेतकरी भारत जाधव यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण (Success Story) घेतले असून, शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेतीची वाट धरली. त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतीमध्ये करण्याचा चंग मनी बांधला. त्यानुसार त्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत आले लागवडीचा निर्णय घेतला.

विक्रमी 350 क्विंटल उत्पादन

शेतकरी भारत जाधव सांगतात, यंदा आपण आपल्या दीड एकर जमिनीमध्ये आले पिकाची लागवड केली. या पिकावर भरपूर कष्ट आणि मेहनत घेतल्याने त्यांना दीड एकर क्षेत्रात जवळपास 350 क्विंटल आल्याचे उत्पादन मिळाले आहे. ज्यातून त्यांना 30 लाख रुपये कमाई झाली आहे. त्यांनी एका वर्षात शेतीतून मिळवलेले हे उत्पन्न एका नोकरदारापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर तोट्याची वाटणारी शेती ही फायद्याची करता येते. हेच भारत जाधव यांनी आपल्या आले शेतीतून दाखवून दिले आहे.

शेतीमध्ये सातत्य महत्वाचे

दरम्यान, आपल्याकडे शेती हा एक जुगार समजला जातो. मात्र, शेतीमध्ये सातत्य ठेवले तर निश्चितच शेतीतून चांगले उत्पन्न मिळवता येते. यापूर्वी आले पिकात एक वेळ अपयश आल्यानंतरही आपण जिद्दीने हे पीक घेत राहिलो. ज्यामुळे आपल्याला सातत्य ठेवल्याने हे उत्पन्न मिळवता आले आहे. त्यामुळे तरुणांनी व्यसनापासून दूर राहून, जर जिद्दीने शेती केली तर त्यांना नोकरीच्या मागे धावण्याची गरज पडणार नाही. असे शेवटी शेतकरी भारत जाधव यांनी म्हटले आहे.