Success Story : ऊस पिकाला फाटा, 16 गुंठ्यात वांगी लागवड; शेतकऱ्याची भरघोस कमाई!

Success Story Of Brinjal Farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या पारंपरिक पिकांऐवजी अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकांना विशेष (Success Story) महत्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे शेतकरी देखील सोयाबीन, कापूस, कांदा या पिकांच्या मागे न लागता कमी कालावधीत येणारी आणि अधिक नफा मिळवून देणाऱ्या भाजीपाला व फळ भाज्यांच्या लागवडीकडे वळत आहे. आज आपण अशाच वांगी उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी आपल्या केवळ 16 गुंठे जमिनीत वांग्याची लागवड करून, अत्यंत कमी कालावधीत 80 हजाराची कमाई (Success Story) केली आहे.

ऊस पिकाला फाटा (Success Story Of Brinjal Farming)

अमृत पाटील असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांची पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रयोगशील शेतकरी (Success Story) म्हणून ओळख आहे. ते चंदगड या दुर्गम भागातील तालुक्यातील कल्याणपूर येथील रहिवासी आहेत.त्यांच्या गावातील बरेच शेतकरी ऊस या बारमाही पिकाची मोठ्या प्रमाणात शेती करतात. मात्र, शेतकरी अमृत पाटील यांनी ऊस पिकाला फाटा देत, पर्यायी पीक म्हणून वांग्याची लागवड करून चांगली कमाई करून दाखवली आहे.

किती मिळतंय उत्पन्न?

परिणामी, त्यांच्या गावात त्यांच्या आधुनिक वांग्याच्या शेतीची सध्या जोरदार चर्चा आहे. अमृत पाटील यांनी मांजरी जातीच्या वांग्याची लागवड केली आहे. त्यांनी एक डिसेंबरला ही वांग्याची लागवड केली होती. त्यांनी गादी वाफ्यावर लागवड केली आहे. आणि आता गेल्या महिन्याभरापासून त्यांना या पिकातून उत्पादन मिळू लागले आहे. ते एका आठवड्यातून दोनदा वांग्याची तोडणी करतात. या पिकासाठी त्यांनी खूपच कमी खर्च केला असून, त्यांना आत्तापर्यंत 80 हजाराचे उत्पन्न मिळाले आहे.

आसपासच्या शेतकऱ्यांसाठी आदर्शवत

शेतकरी अमृत पाटील सांगतात, “आपल्या वांगी पिकाची तोडणी निम्म्यावर आली असून, आणखी एक महिना त्यांना वांग्याच्या पिकातून उत्पादन मिळणार आहे. अर्थात वांग्याच्या पिकातून आपल्याला जवळपास एक लाख रुपयांहुन अधिक कमाई होणार आहे.” त्यामुळे आता शेतकरी अमृत पाटील यांनी एक एकर पेक्षा कमी जमिनीत लागवड केलेल्या वांगी पिकातून अपेक्षित उत्पन्न मिळवले आहे. ज्यामुळे सध्या ते आपल्या गावातील आसपासच्या शेतकऱ्यांसाठी आदर्शवत ठरत आहे.