राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार , ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Rain Paus
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात उत्तर भागात चक्रीय स्थिती तयार होत आहे त्यामुळे पावसासाठी पोषक स्थिती तयार होत आहे राज्यातील काही भागात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून गुरूवारपासून मुसळधार पाऊस पडेल. विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागरात बुधवारी कमी दाबाचा क्षेत्राची तीव्रता वाढणार यात त्यांना अरबी समुद्राकडून बाष्प पूर्व भागाकडे खेचले जाण्याची शक्यता आहे सध्या या भागात चक्रीय स्थिती असून ही स्थिती समुद्रसपाटीपासून 1.5 किलो मीटर आणि 5.8 किलो मीटर उंचीवर आहे. तसाच कर्नाटक किनारपट्टी ते केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर भारतात मान्सूनचा ट्रॅक गंगानगर, दिल्ली, अलिगड, फुरसतगंज, गया, बँकुरा ते बंगाल उपसागराच्या वायव्य भागापर्यंत सक्रिय आहे. चार ते पाच दिवस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल.

सध्याचे हवामान

सध्या राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे मराठवाडा विदर्भ व मध्य महाराष्ट्र खानदेश भागात पावसाच्या तुरळक सरी बरसत आहेत. काही ठिकाणी अधूनमधून ऊन पडत आहे. कमाल तापमानाचा हा किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे.