हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यात काल नाशिक ,सातारा ,पुणे ,सोलापूर ,सांगली, बीड, अहमदनगर, औरंगाबाद ,उस्मानाबाद ,लातूर, परभणी ,हिंगोली ,अमरावती जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरासह ग्रामीण भागात देखील नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. आजही राज्यातल्या अनेक भागात पावसाची शक्यता आहे. दिवसभर हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
आजही राज्यातील पुणे नाशिक सातारा अहमदनगर बीड सोलापूर आशा भागांवर ती ढग दाटलेले दिसून येत आहे त्यामुळे आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान पुण्यामध्ये पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तापमान खाली गेले आहे. पुण्यातील माळीन इथं सर्वात कमी 14.2 अंश सेल्सिअस पाषाण 15.1, नेमगिरी 15.7, जुन्नर 16, तळेगाव 16.1 ,शिवाजीनगर 16.2 ,बालेवाडी 16.6, राजगुरुनगर सतरा, खेड सतरा, हवेली 17.3 ,गिरीवन 17.7 ,अशी किमान तापमानाची नोंद आज सकाळी करण्यात आली आहे.
दक्षिण-मध्य बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे एक कमी दाबाची रेषा केरळपासून उत्तर मध्य महाराष्ट्रमार्गे अंतर्गत कर्नाटकापर्यंत पसरत आहे.मध्य महाराष्ट्रात, कर्नाटक आणि केरळच्या काही भागात हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.