अरबी समुद्रात वेगवान वाऱ्याची शक्यता; ‘या’ चार जिल्ह्यांना यलो अलर्ट 

Heavy Rainfall
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून थैमान घातले.  नंतर आता कुठं पावसाने  राज्यातील काही भागात उसंत घेतली आहे.  पण काही भागात अजूनही मध्यम ते हलक्‍या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. पुढील काही दिवस हीच स्थिती  कायम राहणार असल्याचं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.  आज राज्यात चार जिल्ह्यांना  हवामान खात्याने यलो अलर्ट  व उर्वरित महाराष्ट्रात कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे.

आज पुण्यासह, सातारा, रायगड आणि रत्नागिरी या चारही जिल्ह्यांना  हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.  या ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे.  मुंबई वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार संबंधित चार जिल्ह्यात पुढील दोन ते तीन तासात वेगवान वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.  तर उद्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा शुकशुकाट राहणार आहे. चार जुलै पर्यंत राज्यात कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती राहणार आहे.

आरबी समुद्रात वादळी वारे, मच्छिमारांना इशारा

मागील आठवड्यात महाराष्ट्रात झोडपल्यानंतर  पावसाने उत्तर भारताकडे मार्गक्रमण केलं आहे.  आज मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.  मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे . तर दुसरीकडं अरबी समुद्र सह महाराष्ट्र, गुजरात किनारपट्टी परिसरात वेगवान वाहण्याची शक्यता आहे. असे  हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.  तरी या भागात मासेमारी करण्यासाठी न जाण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. काही ठिकाणी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारा वाहणार आहे.  तर काही ठिकाणी 60 किलोमीटर प्रतितास पेक्षा अधिक वेगाने वारा वाहू शकतो. पुढील किमान पाच दिवस हीच स्थिती राहणार आहे.  त्यामुळे सतर्क राहण्याचे आदेश हवामान खात्याकडून देण्यात आले आहेत.

 

,