आदिवासी शेतकऱ्याचा गहू उत्पादनात प्रथम क्रमांक, हरभरा पिकातही मारली बाजी

Wheat Crop
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : २०२१ – २२ या वर्षात रब्बी पीकाचे चिखलदरा तालुक्यातील पलश्या येथील नंदा काल्या चिमोटे हे गव्हाच्या उत्पादनात राज्यात पाहिले आले. तसेच खारतळेगाव येथील सचिन क्षीरसागर यांनी हरभरा उत्पादनात राज्यात तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून पीक स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये जिल्हा, विभाग व राज्यस्तर अशा घटकांचा समावेश करण्यात आला. रब्बी पिकात ज्वारी, हरभरा, करडई या पिकांसाठी पिकं घेण्यात आली. गुणाच्या आधारावर आदिवासी शेतकऱ्यांना विजय मिळाला. त्यांनी हेक्टरी ५६ गव्हाची आवक मिळवली. यामुळे राज्यात नंदा काल्या चिमोटे यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे.

तसेच राज्यात गहू उत्पादनात सोमनाथ बेंडकोळी ५४ क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळवले, त्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. नंदूरबार जिल्ह्यातील नितीन वसावे यांनी ५२.४४ क्विंटल हेक्टरी उत्पादन घेतले असून त्यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे.

हरभरा पिकासाठी हे तीन क्रमांक निवडले गेले :

मदनगोपाल भोयर यांनी हरभरा पिकाचे हेक्टरी ६८.४० उत्पादन घेत पहिला क्रमांक मिळविला. याच जिल्ह्यात मोहाडी तालुक्यात नावेगाव येथील विक्रांत मोहतुरे यांनी ६२ क्विंटल उत्पादन मिळवले. तर सचिन क्षीरसागर या शेतकऱ्याने ६१ क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.