हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सर्वच भागांमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. अशातच आता राज्यातील दुसरे सर्वात मोठे धरण (Ujani Dam) असलेले उजनी धरण इतिहासातील सर्वात निच्चांकी पातळीवर पोहचले आहे. यापूर्वी मागील 44 वर्षांपूर्वी उजनी धरणाने इतका कमी मायनस पाणीसाठा अनुभवला होता. ज्यामुळे सध्या पुणे आणि सोलापूर या उजनी धरण क्षेत्रात शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या टंचाईला (Ujani Dam) सामोरे जावे लागत आहे.
महिनाभर आधीच 59.30 टक्क्यांवर (Ujani Dam Water Storage)
उजनी धरणाची (Ujani Dam) इतकी कोरडी अवस्था यापूर्वी कधीच पाहायला मिळालेली नव्हती. जितकी यंदाच्या मे महिन्यात पाहायला मिळत आहे. यापूर्वी 30 जून 2019 रोजी उजनी धरण वजा 59.05 टक्के इतक्या निच्चांकी पातळीला गेले होते. त्यानंतर पाच वर्षात ही नीचांकी पातळी एक महिना आधीच ओलांडत उजनी धरणाने थेट वजा 59.30 टक्के एवढी निच्चांकी पातळी गाठली आहे. त्यामुळे उजनी धरणावरील सर्व यंत्रणा बंद पडल्या असून धरणात आता, केवळ वजा 31 टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाने म्हटले आहे.
यंदा केवळ 60 टक्के भरले होते
सरकारी आकडेवारीनुसार, उजनी धरणाची (Ujani Dam) क्षमता 100 टक्के भरल्यावर 112 टीएमसी एवढी असून, प्रशासनाने धरणात 111 टक्के म्हणजे 123 टीएमसी पाणी साठवण्याची व्यवस्था केलेली आहे. अशा स्थितीत 1980 साली पाणी भरण्यास सुरुवात झालेल्या या उजनी धरणाने 44 वर्षातील सर्वात निच्चांकी पातळी ओलांडली आहे. यापूर्वी 30 जून 2019 साली जेंव्हा धरण 96 टक्के भरले होते तेंव्हा उणे 59.05 टक्के ही निच्चांकी पातळी गाठली होती. यंदा धरणात केवळ 60 टक्के पाणी जमा झाले असताना एक महिना आधीच त्या निच्चांकी पातळीवर धरणाचा पाणीसाठा पोहोचला आहे.
मॉन्सूनच्या आगमनावर भिस्त
परिणामी, प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता येत्या जून महिन्यात वेळेत पाऊस पडल्यास काळजी करण्याचे कारण नसणार आहे. मात्र, मॉन्सूनच्या पावसाला विलंब झाल्यास, चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतीय हवामानशास्र विभागाने आपला नुकताच मॉन्सूनबाबतचा सुधारित अंदाज जाहीर केला असून, यामध्ये जून महिन्यात राज्यात चांगला पाऊस पडणार असल्याचे भाकीत करण्यात आले आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.