राज्याच्या विविध भागात वादळी पावसाचा इशारा; उन्हाचा चटकाही पुन्हा वाढणार

Weather
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या विविध भागात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. कमाल तापमानातही चढ-उतार सुरूच असून, उन्हाचा चटका पुन्हा वाढणार आहे. आज (ता. २६) जळगाव येथे उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.राज्यातील ढगाळ हवामान निवळू लागले आहे. आज (ता. २६) मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. पावसाळी वातावरण ढगाळ आकाशामुळे कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहे. दोन दिवसांत कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

कुठे किती तापमान ?

सोमवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे देशातील उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित ठिकाणी तापमान ४२ अंशांपेक्षा कमी झाले आहे. कोकणात कमाल तापमान ३४ ते ३७ अंशांदरम्यान, मध्य महाराष्ट्रात २५ ते ४४ अंश, मराठवाड्यात ३७ ते ४२ अंश आणि विदर्भात ३९ ते ४२ अंशांच्या दरम्यान आहे.

या भागाला यलो अलर्ट

27 एप्रिल – उद्या दिनांक 27 एप्रिल रोजी नाशिक, अहमदनगर, जळगाव, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
28 एप्रिल – दिनांक 28 एप्रिल रोजी नाशिक, अहमदनगर, जळगाव ,बुलढाणा, अकोला ,यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजा होऊन पाऊस हजेरी लावेल.