हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या देशासह राज्यातील वातावरणात दिवसेंदिवस बदल (Weather Forecast) होताना दिसत आहे. त्यातच आता सर्वांना मॉन्सूनची (Monsoon Update) चाहूल लागली असताना देशातील तापमानाचा पारा वाढत आहे. तर दुसरीकडे मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात पावसाचा अंदाज हवामान खात्याने (IMD) व्यक्त केला आहे. पुढील दोन दिवसात राज्यात पावसाचा अंदाज (Weather Forecast) आहे.
दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता आहे. तर उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे (Weather Forecast).
मुंबई शहर आणि उपनगरांत सकाळच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे (Weather Forecast) . कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35°C आणि 29°C च्या आसपास असेल.
दरम्यान, सध्या सर्वांना मॉन्सूनची चाहूल (Weather Forecast) लागली असून देशात मॉन्सून लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मॉन्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. तर मागील काही दिवसांपूर्वी मॉन्सून अंदमानात दाखल झाला असून (Andaman Monsoon Arrival) तो आता पुढे सरकत आहे.