हॅलो कृषी ऑनलाईन : देशाच्या वायव्येकडील भागातून पुन्हा एकदा चक्रीय वाऱ्यांचा झोत (Weather Update) उत्तरेकडील राज्यांमध्ये दाखल होत आहे. ज्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस हिमालयीन राज्यांमध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे. यामध्ये राजधानी दिल्लीसह आसपासच्या पंजाब, राजस्थान, हरियाणा, जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर अनेक ठिकाणी बर्फवृष्टी होण्याची देखील शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (Weather Update) (आयएमडी) व्यक्त करण्यात आला आहे.
काय आहे महाराष्ट्रातील स्थिती? (Weather Update In Maharashtra)
देशातच नव्हे तर महाराष्ट्रातील हवामानातही (Weather Update) सध्या कमालीचा बदल पाहायला मिळतोय. कधी थंडी, कधी पाऊस तर कधी उन्हाची तीव्र ताप, अशा हवामानाच्या तीनही स्थिती सध्याच्या घडीला अनुभवायला मिळत आहे. अशातच आजपासून राज्यातील पूर्वेकडील काही भागांमध्ये पावसाचे वातावरण काहीसे निवळणार आहे. मात्र, गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिणेकडील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे. असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
किमान, कमाल तापमानात वाढ
गेल्या दोन ते तीन दिवसांच्या ढगाळ वातावरणामुळे राज्यातील किमान तापमानात मोठी घट दिसून आली आहे. चालू आठवड्याच्या सुरुवातीला उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये किमान तापमान हे १० अंशांच्या खाली घसरलेले होते. मात्र, मागील २४ तासांमध्ये त्यात मोठी घट दिसून आली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे १३.५, धुळे १५.५ जळगाव १८.७ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले आहे. त्यामुळे राज्यभरात पहाटे जाणवणारी अल्प थंडी काहीशी कमी झाली आहे. तर याउलट मागील २४ तासांमध्ये राज्यातील कमाल तापमानात वाढ दिसून आली असून, मालेगाव ३५.०, सांगली ३५.२, सोलापूर ३६.२, चंद्रपूर ३५.८, वाशीम ३६.० आणि यवतमाळ ३५.० या काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ३५ अंशाहून अधिक असल्याचे पाहायला मिळाले आहे.