Weather Update : आजपासून 5 दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता; या जिल्ह्यांना यलो अलर्ट!

Weather Update Today 25 Feb 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यतील अनेक भागांमध्ये पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज (Weather Update) आहे. परिणामी, संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना आजपासून येलो अलर्ट देण्यात आल्याचे हवामान विभागाने विभागाने म्हटले आहे. तर राज्यातील किमान आणि कमाल तापमानात घट सुरूच असून, सध्या कमाल आणि किमान तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे. याशिवाय देशातील अनेक भागांमध्ये पावसाची स्थिती कायम असल्याचे हवामान विभागाने (Weather Update) म्हटले आहे.

‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट (Weather Update Today 25 Feb 2024)

हवामान विभागाच्या (Weather Update) माहितीनुसार, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस भाग बदलत विजांच्या कडकडासह हा पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रब्बी पिकांसह, काढणी सुरु असलेल्या हळद पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या काढणीला केलेल्या पिकांची योग्य ते नियोजन करत काळजी घ्यावी, असे आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

पूर्व किनारपट्टीवर चक्राकार वारे

पश्चिमी चक्रवाताने हळूहळू पूर्वकडील राज्यांमधून प्रामुख्याने पश्चिम बंगालची खाडीहून बंगालच्या उपसागरातून प्रवेश केला असून, त्यात त्या ठिकाणी त्याच्या कमी दाब पट्ट्यात रूपांतर झाले आहे. ज्यामुळे देशाच्या संपूर्ण पूर्व किनारपट्टीवर कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम पाहायला मिळत आहे. विशाखापट्टणम किनारपट्टीवर या कमी दाब क्षेत्राचा केंद्रबिंदू असून, विशाखापट्टमहुन महाराष्ट्राच्या जवळपास अर्ध्या भागावर हे चक्राकार वारी वाहत आहेत. परिणामी आजपासून पुढील पाच दिवस पाऊस पाहायला मिळणार आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

तापमानातील घट कायम

दरम्यान, मागील 24 तासांमध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड या ठिकाणी राज्यातील निच्चांकी 7.1 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. अर्थात शनिवारच्या आज किमान तापमानात 1 अंशाने घसरण झाली आहे. तर कमाल तापमानातही घट झाली असून, मागील 24 तासांमध्ये राज्यातील वाशीम या ठिकाणी उच्चांकी 35.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वाशीम 35.6 व सोलापूर 35.4 वगळता राज्यातील सर्व ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 35 अंशांखाली आहे.