Weather Update : आजपासून मान्सून पुन्हा सक्रिय; ‘या’ १० जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस

Rain Paus
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात बहुतांशी भागात पावसाने (Weather Update) उघडीप दिली होती मात्र आता आजपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मागच्या जवळपास दोन आठवड्यांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र आता पुन्हा पाऊस सक्रिय होणार असून शेतकऱ्यांनी शेतातील कामे उरकून घ्यावीत असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. दरम्यान कोल्हापूर, सातारा,मराठवाडा भागात काल (४) हलक्या पावसाने हजेरी लावली. तर राज्यातल्या अनेक भागात ढगाळ हवामान राहिले.

या दहा जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस

हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या 10 जिल्ह्यात जोरदार पाऊस (Weather Update) होण्याचा अंदाज आहे.

मान्सून राहणार सक्रिय

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारपासून पुन्हा मान्सून (Weather Update) मूळ जागेवर किंवा त्यापेक्षाही अधिक दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता आहे. दरम्यान, चेन्नई, नेल्लोर, मच्छलिपटणम ह्या शहरादरम्यान बंगालच्या उपसागरात पूर्व किनारपट्टीसमोर जमिनीपासून 1 किमी अंतरावर असलेल्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळं मान्सून 4 ते 12 ऑगस्ट या 12 दिवस महाराष्ट्रासहित दक्षिण भारतात सक्रिय राहण्याची शक्यता आहे.

येत्या तीन दिवसात या भागात पाऊस

येत्या तीन दिवसांत राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान (Weather Update) विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह घाट परिसरात, काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती सतर्कता बाळगावी असं आवाहनही करण्यात आलं आहे.