आज सोयाबीन बाजारभावात काय झाला बदल ? जाणून घ्या राज्यातील सोयाबीन बाजारभाव

Soyabean rate today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज सोयाबीन ला सर्वाधिक सात हजार 337 इतका कमाल भाव मिळाला आहे. हा भाव लासलगाव निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला आहे. आज लासलगाव निफाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पांढऱ्या सोयाबीनची 139 क्विंटल इतकी आवक झाली. त्याकरिता किमान भाव 7090 कमाल भाव 7337, सर्वसाधारण भाव सात हजार 330 रुपये इतका मिळाला आहे. त्याखालोखाल उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सात हजार 316 रुपये इतका कमाल भाव मिळाला आहे. तर नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 7320 रुपये इतका भाव मिळाला आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सात हजार 275 इतका कमाल भाव मिळाला आहे. दरम्यान काल दिनांक 24 रोजी मिळालेल्या कमाल भावाच्या तुलनेत आजचा भाव घसरलेला दिसतोय. काल देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सात हजार 565 रुपयांचा कमाल भाव मिळाला होता. मात्र आज कमाल दर सात हजार 300 रुपयांवर आले आहेत. सोयाबीन ना सर्वसाधारण दर हे सहा हजार सहाशे रुपये ते सात हजार शंभर रुपयांपर्यंत मिळत आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 25-3-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/03/2022
माजलगावक्विंटल155550070226900
राहूरी -वांबोरीक्विंटल4695169516951
उदगीरक्विंटल2800725073167283
लोहाक्विंटल57691171507020
तुळजापूरक्विंटल190695072007100
राहताक्विंटल15710071827150
अमरावतीलोकलक्विंटल2691670072326966
नागपूरलोकलक्विंटल251550073206865
कोपरगावलोकलक्विंटल104500072857171
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल139709073377330
जालनापिवळाक्विंटल1722620073007150
अकोलापिवळाक्विंटल1621600072756800
परभणीपिवळाक्विंटल80500072007100
चिखलीपिवळाक्विंटल373650071006800
बीडपिवळाक्विंटल114500071006723
वर्धापिवळाक्विंटल104630070006750
भोकरपिवळाक्विंटल70500171336067
मलकापूरपिवळाक्विंटल235555072456655
वणीपिवळाक्विंटल264656570806800
शेवगावपिवळाक्विंटल19660070007000
देउळगाव राजापिवळाक्विंटल21680071227000
धरणगावपिवळाक्विंटल10684568456845
तासगावपिवळाक्विंटल25665069006850
मंठापिवळाक्विंटल18652670007000
उमरीपिवळाक्विंटल11710071507125