शेतकऱ्यांना कांदा रडवणार ? दर 3 हजारच्या खाली घसरले …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्पन्न मिळवून देणारे भरवशाचे पीक म्हणून कांदा या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतात. मात्र मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी चढ उतार पाहावयास मिळत आहे. अगदी चार दिवसांपूर्वीच कांद्याला 3 हजार पेक्षा जास्तीचा दर मिळाला होता मात्र मंगळवारपासून कांद्याच्या दरात कमालीची घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये 26 ऑक्टोबर रोजी किमान दर 851 रुपये, कमाल किंमत 3231 रुपये, सर्वसाधारण किंमत 2750 रुपये प्रति क्विंटल होते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.

घसरण कायम नाही …

कोणत्याही शेतीमालाची आवक वाढली की, दर घसरतात हे बाजारपेठेचे सुत्रच आहे. त्यामुळे मध्यंतरी दर वाढल्याने केवळ राज्यातूनच नाही तर परराज्यातूनही कांद्याची आवक वाढलेली आहे. आवक वाढल्याने मागणी कमी झाली आहे. त्यामुळे देखील दर घसरले असल्याचे महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत डिगोले यांनी एका टीव्ही माध्यमाशी बोलताना सांगितले आहे. शिवाय ही घसरण काय कायम राहणार नाही. जुना कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक नाही. त्यामुळे थोड्या दिवसांमध्ये पुन्हा दर वाढणार आहेत.

मंगळवार चे दर

–पिंपळगाव मार्केटमधील कांद्याचा किमान भाव 1500 रुपये, कमाल 3581 आणि सर्वसाधारण दर 2851 रुपये प्रति क्विंटल होता.
–विंचूरमध्ये किमान दर 1000 रुपये, कमाल 3201 रुपये आणि सर्वसाधारण दर 2750 रुपये होता.
— निफाडमध्ये कांद्याचे सर्वसाधारण दर 2750 रुपये प्रति क्विंटल होता. तर किमान किंमत 1100 रुपये होती तर कमाल दर हे 3060 रुपये प्रति क्विंटल होती.

लासलगावमध्ये कांद्याच्या किमंती

–25 ऑगस्ट रोजी किमान दर 600, सर्वसाधरण किंमत 1551 होती तर कमाल दर 1781 रुपये प्रति क्विंटल होती.
–3 सप्टेंबर, किमान दर 500, सर्वसाधारण किंमत 1540 रुपये आणि कमाल 676 रुपये प्रति क्विंटल होती.
–2 ऑक्टोबर रोजी किमान किंमत 1000 रुपये, सर्वसाधारण किंमत 2970 रुपये आणि कमाल 3101 रुपये प्रति क्विंटल होती.
–१८ ऑक्टोबर रोजी किमान किंमत 900 रुपये, सर्वसाधारण किंमत 3100 रुपये आणि कमाल किंमत 3639 रुपये प्रति क्विंटल होती.
–26 ऑक्टोबर रोजी किमान दर 851 रुपये, सर्वसाधारण किंमत 2750 रुपये आणि कमाल किंमत 3231 रुपये प्रति क्विंटल होती.