सोलापुरात कांद्याला मिळाला कमाल 3900 रुपयांचा दर, पहा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो नगदी पीक म्हणून शेतकरी कांदा पिकाचे उत्पादन घेतात. हल्लीचा विचार करता कांदा क्षेत्रामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. देशामध्ये अकरा लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली आहे. यामधून 220 लाख टन उत्पादन अपेक्षित धरलं जात आहे.

दरम्यान मागील आठवड्यापासून कांद्याच्या दरात सुधारणा होताना दिसत आहेत. आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज कांद्याला सर्वाधिक 3 हजार 900 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. हा दर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथं मिळाला असून आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 45016 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. याकरिता किमान शंभर, कमाल 3900 रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये इतका मिळाला आहे. तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथेच कांद्याची सर्वाधिक आवक झालेली दिसून येत आहे. त्याखालोखाल लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 11401 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे, तर या ठिकाणी किमान भाव 900 रुपये, कमाल भाव 2701, सर्वसाधारण भाव 2350 रुपये प्रति क्विंटल साठी मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक आणि दरही चांगला मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 21-2-22 कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/02/2022
कोल्हापूरक्विंटल916650030001700
औरंगाबादक्विंटल375100027001850
साताराक्विंटल154100026001800
मंगळवेढाक्विंटल12555032602200
कराडहालवाक्विंटल35150030003000
सोलापूरलालक्विंटल4501610039002000
येवलालालक्विंटल1000050027002200
येवला -आंदरसूललालक्विंटल500050025762200
धुळेलालक्विंटल68012529102300
लासलगावलालक्विंटल1140090027012350
जळगावलालक्विंटल48570028001700
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल800055026402100
नागपूरलालक्विंटल1000250030002875
राहूरी -वांबोरीलालक्विंटल590930028001800
कळवणलालक्विंटल250040028502150
संगमनेरलालक्विंटल675250031001800
मनमाडलालक्विंटल450050025202200
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल698050026352100
देवळालालक्विंटल303070029002500
राहतालालक्विंटल144260028002350
उमराणेलालक्विंटल5500101128512200
पुणेलोकलक्विंटल1406770028001750
पुणे- खडकीलोकलक्विंटल8120016001400
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6250028002650
कल्याणनं. १क्विंटल3160028002300
नागपूरपांढराक्विंटल1000150018001725
नाशिकपोळक्विंटल290585035002550
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1275050029002350