हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात कमाल तापमानाचा पारा पस्तिशीच्या पार पोहोचला आहे. त्यामुळे उन्हाचा चटका अधिकच तापदायक ठरतो आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली असून यातच बहुतांशी काही ठिकाणी किमान तापमान तेरा अंशांच्या वर गेल्याने गारठा कमी झाला आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून किमान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान, हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 22 फेब्रुवारी रोजी राज्यात सर्वाधिक तापमान हे सोलापूर जिल्ह्यामध्ये नोंदवण्यात आले आहे. सोलापुरात तापमान 37.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलाय, कोल्हापुरात 35.5, नांदेड 34.2, पुणे 35.4, औरंगाबाद 34.3, सांगली 36.9 ,परभणी 35.9, जेऊर 35 ,नाशिक 35.4, सातारा 35 .1 , उस्मानाबाद 34.2,, बारामती 34.2 ,जळगाव येथे 36 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद दिनांक 22 रोजी करण्यात आली आहे.
दरम्यान बिहार, झारखंड, ओरिसा आणि पश्चिम बंगाल तसंच सिक्कीम मध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून दिनांक 24 आणि 26 फेब्रुवारी पर्यंत वर्तवण्यात आला आहे, तर 25 फेब्रुवारी रोजी ईशान्य भारतात गडगडाटी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे व्यक्त करण्यात आला आहे.