सोयाबीनच्या दरात मोठी घसरण ; पहा सध्या काय आहे बाजारातील चित्र

Soyabean rate today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीन या दोन्ही शेतमालाचे भाव चांगले मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. एवढंच काय सोयाबीन आता शेवटच्या हंगामामध्ये असतानासुद्धा मागील आठवड्यापर्यंत सोयाबीनला सात हजार पाचशे ते सहाशे रुपयांपर्यंत कमाल भाव मिळत होता. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. शिवाय बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवकही चांगली होत होती. मात्र या आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. सोयाबीनचा दर उतरून पुन्हा एकदा सात हजार ते सात हजार शंभर रुपयांच्या घरामध्ये आला आहे. हा सोयाबीन चा कमाल दर झाला तर सोयाबीन चा सर्वसाधारण दर हा पाच हजार 550 ते 6800 रुपयांच्या दरम्यान आहे.

मध्यंतरी युक्रेन आणि रशिया या दोन देशांच्या युद्धाच्या सुरवातीच्या काळापासून सोयाबीनच्या दरामध्ये वाढ झालेली दिसून येत होती. ही वाढ मागील आठवड्यापर्यंत कायम होती. मात्र या आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात चांगलीच घसरण झाल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे कापसाचे दर मात्र कमाल 12 हजार रुपयांवर टिकून आहेत.

दरम्यान आज सुट्टी असल्यामुळे केवळ शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सोयाबीनचे भाव प्राप्त झाले आहेत. आज शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 11 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान दर 6500, कमाल दर 6600 आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपयांपर्यंत मिळाला आहे.दिनांक 2 मे रोजी प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची चांगली आवक होताना दिसून येत आहे. दिनांक दोन मे रोजी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पंधरा हजार पाचशे वीस क्विंटल इतक्या सोयाबीनची आवक झाली आहे. त्याकरिता किमान भाव सहा हजार सातशे कमाल भाव सहा हजार 998 तर सर्वसाधारण भाव सहा हजार 850 रुपये इतका मिळाला.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/05/2022
शिरुरक्विंटल11650066006600
02/05/2022
लासलगावक्विंटल520390070606881
लासलगाव – विंचूरक्विंटल324400068906681
औरंगाबादक्विंटल20450067005600
संगमनेरक्विंटल10670067506725
कारंजाक्विंटल2200611568056450
परळी-वैजनाथक्विंटल700625068746701
लोहाक्विंटल46650069006711
तुळजापूरक्विंटल145650067006600
राहताक्विंटल9665166906670
अमरावतीलोकलक्विंटल1848625065116380
नागपूरलोकलक्विंटल36560065006275
हिंगोलीलोकलक्विंटल500640068006600
कोपरगावलोकलक्विंटल90600068996800
मेहकरलोकलक्विंटल710630067806600
ताडकळसनं. १क्विंटल30650068506700
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल312450168766775
लातूरपिवळाक्विंटल15520670069986850
जालनापिवळाक्विंटल1079550070006650
अकोलापिवळाक्विंटल634590070706700
यवतमाळपिवळाक्विंटल236650070006750
परभणीपिवळाक्विंटल160700071107075
मालेगावपिवळाक्विंटल40559965716200
चिखलीपिवळाक्विंटल860630068006550
बीडपिवळाक्विंटल19600066516475
वाशीमपिवळाक्विंटल2400650068506600
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600640068006500
वर्धापिवळाक्विंटल37600066006350
भोकरपिवळाक्विंटल31490066665783
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल290650066006550
जिंतूरपिवळाक्विंटल25630068006300
मलकापूरपिवळाक्विंटल142597568956365
दिग्रसपिवळाक्विंटल120635068006650
गेवराईपिवळाक्विंटल93602563716200
परतूरपिवळाक्विंटल42657066106600
गंगाखेडपिवळाक्विंटल42670070006800
आंबेजोबाईपिवळाक्विंटल500630068906780
मंगरुळपीरपिवळाक्विंटल1578500070705950
मंगळूरपीर – शेलूबाजारपिवळाक्विंटल685640067006600
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120660068006700
गोंडपिंपरीपिवळाक्विंटल210655070506750
काटोलपिवळाक्विंटल38480065705550