Weather Update : पुढच्या दोन – तीन दिवसात राज्यातल्या ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

Heavy Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र काही ठिकाणी हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या पावसाच्या (Weather Update) सरी बरसत आहेत. दरम्यान, आजही मुंबईसह परिसरात आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कशी असेल पावसाची स्थिती ?

कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस पावसाची काहीशी उघडीप मिळू शकते. मुंबईसह कोकणातील चार जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची (Weather Update) जाणवत असल्याचे हवामान तज्ञांनी सांगितले आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील सह्याद्री घाटमाथ्यावरील नद्या उगम आणि धरण पाणलोट क्षेत्रात देखील मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळं नद्या आणि कॅनॉल पात्रातील सततचा विसर्ग तसाच कायम ठेवावा लागणार आहे.

विदर्भातील काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी किरकोळ हलक्या पावसाची (Weather Update) शक्यता पुढील आठवडाभर जाणवणार आहे. गुजराथ राज्य आणि दक्षिण राजस्थानमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजपासून बद्री-केदार, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश तसेच गया, जगन्नाथ-पुरी, कोलकातामधील पर्यटन क्षेत्रात जोरदार पावसाची शक्यता जाणवत असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.