हॅलो कृषी ऑनलाईन : शेती करताना शेतीमध्ये सातत्य आणि चिकाटी (Sandalwood Farming) हे गुण असणे खूप महत्वाचे असते. कारण शेतीमध्ये पीक घेणे हे शेतकऱ्याच्या हाती असते. मात्र, त्या पिकाला यावर्षी योग्य भाव मिळेल की नाही? याबाबत शेतकऱ्यांना कोणतीही आगाऊ कल्पना नसते. असे असूनही अपेक्षेपोटी शेतकरी दरवर्षी आपल्या शेतीमध्ये पिकांचे उत्पादन घेत असतो. अर्थात शेतकऱ्यांना काही नफा तर तोटा सहन करावा लागतो. मात्र, आज आपण अशा शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता ८ वर्षांपूर्वी आपल्या शेतीमध्ये चंदन लागवड केली होती. याच चंदनाच्या शेतीच्या माध्यमातून या शेतकऱ्याला लवकरच कोट्यवधींची कमाई (Sandalwood Farming) मिळणार आहे.
कर्नाटकातून उपलब्ध केली रोपे (Sandalwood Farming Earn Lakhs Of Money)
अविनाश कुमार यादव असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. विशेष म्हणजे शेतकरी विनाश हे यूपी सरकारच्या पोलिस विभागाची नोकरी करत होते. मात्र, त्यांनी २००५ साली नोकरी सोडून शेती सुरु केली. २००५ पासून शेती करताना त्यांना २०१६ मध्ये चंदन लागवडीची (Sandalwood Farming) कल्पना सुचली. त्यानुसार त्यांनी कर्नाटकातून रोपे आणून, 2016 मध्ये आपल्या माळरान जमिनीवर चंदनाच्या या 50 रोपांची लागवड केली. अजून त्यांना चंदन विक्रीसाठी काही वर्षांची प्रतीक्षा आहे. आणखी काही वर्षे पूर्ण झाल्यानंतर अविनाश कुमार यांना कोट्यवधींचे उत्पन्न मिळणार आहे, असे ते सांगतात.
८ वर्षानंतर कितीये किंमत?
२०१६ मध्ये त्यांना एक चंदनाच्या रोपासाठी 200 रुपये मोजावे लागले होते. अविनाश कुमार यांनीच परिसरात प्रथम पांढऱ्या चंदन लागवडीचा पाया घातला. त्यांच्या या शेतीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. आजच्या घडीला चंदनाच्या झाडांची उंची ही 13 ते 14 फूट झाली आहे. आज हे एक चंदनाचे झाड 30 ते 35 हजार रुपयांना विकले जाऊ शकते. असे ते सांगतात. मात्र, अविनाश कुमार यांनी अद्याप कोणत्याही झाडांची विक्री केली नाही. आणखी 10 वर्षांनी या झाडांच्या माध्यमातून अविनाश कुमार यांना करोडो रुपये मिळणार आहेत. सध्या या चंदनाला 1200 रुपये किलोचा दर मिळत असल्याचे ते सांगतात.
साबण, अगरबत्तीसाठी मोठी मागणी
शेतकरी अविनाश कुमार सांगतात, सध्या पांढऱ्या चंदनाला बाजारात मोठी मागणी आहे. औषधे, साबण, अगरबत्ती, जपमाळ, फर्निचर, लाकडी खेळणी, हवन, अत्तर, विविध वस्त बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात चंदनाचा वापर केला जातो. दरम्यान, एका एकरात चंदनाची 410 रोपे लावता येतात. दोन झाडांच्या मध्ये 10 फूट अतर असणे गरजेचे आहे. एका एकरात चंदनाची लागवड करण्यासाठी सुमारे एक लाख रुपयांचा खर्च येतो. असेही त्यांनी शेवटी नमूद केले आहे.