Bullock Cart Race : बैलाला मानतात स्वत:चा मुलगा; शेतकऱ्याचे राज्या बैलाशी अतूट नाते!

Bullock Cart Race
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात प्रामुख्याने (Bullock Cart Race) पुण्यातील खेड, पुरंदर, मावळ, मुळशी हे तालुके बैलगाडा शर्यत, कुस्ती, देवाचे बगाड अशा पारंपारिक खेळ पद्धतींसाठी प्रसिद्ध आहेत. या भागात बैलगाडा शर्यत हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. बैलगाडा मालक आपल्या बैलावर स्वतःच्या पोटच्या मुलासारखे प्रेम करतात. याच पार्श्वभूमीवर आज आपण नंदकुमार कुटे आणि त्यांच्या राज्या बैलाच्या अतूट नात्याविषयी (Bullock Cart Race) जाणून घेणार आहोत.

राज्या बैल नावाप्रमाणेच राज्या (Bullock Cart Race)

पुण्यातील पिंपळे सौदागर येथील नंदकुमार कुटे यांना लहानपणापासूनच बैलगाडा शर्यतीची आवड होती. आपल्याकडेही बैल असावीत आणि त्या बैलांनी शर्यतीत उतरावे, असे त्यांचे स्वप्न होते. त्यामुळे कुटे यांनी 22 वर्षांपूर्वी राज्या आणि झेंड्या अशी दोन बैल घेतली. त्यातील राज्या हा बैल शर्यतीमध्ये नावाप्रमाणेच राज्या आहे. राज्या हा खिलारी बैल असून, या बैलांनी नंदकुमार कुटे यांना पंचक्रोशीमध्ये मान मिळवून दिला आहे. अनेक प्रकारच्या शर्यती या बैलाने जिंकल्या. यात तळेगांव दाभाड़े, उंचखडक (जून्नर), टाकवे (मावळ), आळंदी देवाची, मेदणकरवाडी, शिंदेगांव, रेटवडी-धामनखेल जून्नर, बहुळ, ओतुर, तळेगाव दाभाड़े या ठिकाणच्या शर्यतीत मैदान मारले.

जिंकल्यात अनेक शर्यती

प्रत्येक महत्वाच्या गावात असणाऱ्या यात्रा, जत्रांमध्ये बैलगाडा शर्यती घेतल्या जातात. त्यात अनेक बैलगाडा मालक आपल्या आवडत्या बैलाला या शर्यतीत उतरवतात. मुलाप्रमाणे शेतकरी आपल्या बैलाचा सांभाळ करतो. सर्व गोष्टी त्याच्या मुलाप्रमाणे करतो. मात्र, अनेक शर्यतीमध्ये आपल्या मालकाची मान गर्वाने उंचवणारा राजा बैल हा नंदकुमार कुटे यांच्यासाठी स्वतःच्या मुलाप्रमाणे आहे, असे ते सांगतात.

शर्यत असते डोळ्यांचे पारणे फेडणारी

दावणीवर शांत वाटणाऱ्या, रस्त्याने निवांत चालणाऱ्या राज्याला छकड्याला जुंपताच त्याच्या अंगात वीज संचारते. भल्याभल्या बैलांना नमवणाऱ्या राज्याची शर्यत डोळ्यांचे पारणे फेडणारी असते, असे कुटे सांगतात. पांढराशुभ्र, देखण्या आणि तगड्या शरीरयष्टीच्या राज्याचे देखील आपल्या मालकावर प्रचंड प्रेम आहे आणि यामुळेच त्याने नेहमी आपल्या विजयाची माळ आपल्या मालकाच्या गळ्यात टाकली आहे.