Black Wheat Farming : अहमदनगरमध्ये काळ्या गहू शेतीचा यशस्वी प्रयोग; शेतकऱ्याची सर्वदूर चर्चा!

Black Wheat Farming In Maharashtra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी सध्या नवनवीन पिके (Black Wheat Farming) घेण्याचा प्रयोग करत असून, विशेष म्हणजे त्यात त्यांना यश देखील मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील टाकळी येथील शेतकऱ्याने हा लोहयुक्त काळा गहू पिकवला आहे. विशष म्हणजे या शेतकऱ्याने काळ्या गव्हाचा पहिलाच प्रयोग असून, काळ्या गव्हाचे पाच किलो बियाणे वापरून दोन गुंठ्यांत पंचेचाळीस किलो उत्पन्न घेतले आहे. माळरान जमिनीवर त्यांनी हे काळ्या गव्हाचे पीक (Black Wheat Farming) घेतले असून, ज्याची सर्वदूर चर्चा होत आहे.

इंटरनेटवर मिळवली माहिती (Black Wheat Farming In Maharashtra)

प्रसन्ना धोंगडे असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील टाकळी गावचे रहिवासी आहेत. शेतकरी प्रसन्ना धोंगडे यांच्या आई वडिलांना रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होत असल्याने त्यांनी काळा गहू या आजारासाठी गुणकारी असल्याचे वाचले. मग इंटरनेटवर पीक उत्पादनाची माहिती मिळवली. काळ्या गव्हाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. काळा गव्हाचे बियाणेकोठे मिळते याचा शोध घेतला.

उत्तरप्रदेशातून उपलब्ध केले बियाणे

उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे राहत असलेल्या आपल्या मित्रामार्फत पंजाबमधून ५ किलो काळ्या गव्हाचे बियाणे ५५० रुपयांना खरेदी केले होते. त्यांनी आपल्या शेतात दोन गुंठ्यांत गव्हाची लागवड केली. त्यामध्ये ४५ किलो उत्पादन मिळाले. सध्या काळ्या गव्हाला किलोला ७० रुपये भाव मिळतो. काळ्या गव्हामध्ये सामान्य गव्हापेक्षा ६० टक्के जास्त लोह असते. गव्हाचा काळा रंग त्यामध्ये असलेल्या अँथोसायनिन नावाच्या रंगद्रव्यामुळे होतो. या जातीमध्ये अँटिऑक्सिडंट घटक आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. याची चव सर्वसामान्य गव्हासारखीच असते.

अधिक उत्पादनासाठी प्रयत्नशील

काळ्या गव्हाची लागवड प्रामुख्याने मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये केली जाते. दरम्यान, दोन गुंठे जमिनीत लागवड केलेल्या या पाच किलो बियाणातून त्यांना जवळपास ४५ किलो उत्पादन मिळाले आहे. या उत्पन्नातून १० किलो गहू घरी खाण्यासाठी ठेवणार असून, बाकी गहू बियाणे म्हणून वापरून शेतीमधून अधिक उत्पन्न घेणार आहे. असे शेतकरी प्रसन्ना धोंगडे यांनी सांगितले आहे