हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडच्या काळात अनेक शेतकरी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग (Success Story) करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भरघोस उत्पादन घेत आहेत. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी आपल्या आंबा पिकातून मोठे आर्थिक उत्पन्न मिळवले आहे. त्यांनी आपल्या आंबा बागेत विविध जातींची लागवड केली असून, त्यांना त्यातून वार्षिक 8 ते 9 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहेत. विशेष म्हणजे ते केवळ आठवी पास असून, त्यांच्या यशस्वी आंबा शेतीची सर्वदूर चर्चा (Success Story) होत आहे.
वर्षानुवर्षे मिळणार नफा (Success Story Of Mango Farming)
नवीन कुमार राय असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत. नवीन कुमार राय हे केवळ आठवी पास असून, त्यांनी आपल्या शेतीमध्ये विविध जातीच्या आंब्याची लागवड (Success Story) केली आहे. यातून ते वार्षिक 8 ते 9 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. नवीन कुमार राय यांनी 5 वर्षांपूर्वी आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर आंब्याची झाडे लावली होती. आता त्या झाडाला चांगली फळे लगडली आहेत. ज्यामुळे आता आंबा लागवडीवर एकदा खर्च केल्यानंतर, यातून त्यांना वर्षानुवर्ष लाखो रुपयांचा नफा मिळत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कसे केले नियोजन?
शेतकरी नवीन कुमार राय सांगतात, आंबा बागेची जास्त काळजी घेण्याची गरज नसते. केवळ वेळोवेळी खुरपणी आणि वेळोवेळी गरजेनुसार पाणी द्यावे लागते. आपण आंब्याच्या बागेला कोणत्याही प्रकारचे रासायनिक खते वापरत नाही. त्यामुळे आंब्याचे फळ मोठे होते. तसेच फळातील गोडवा कायम राहत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अर्थात शेतकऱ्यांनी आंबा बागेचे नियोजन करताना रासायनिक खतांचा वापर करणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे.
मिळतोय भरघोस नफा
शेतकरी नवीन कुमार राय सांगतात, आपल्या बागेत आंब्याच्या विविध जाती लागवड करण्यात आल्या असून, दशहरी आंबा लोकांना खूप आवडतो. आम्रपाली आंब्याचा गोडवाही त्या तुलनेत कमी नाही. आम्रपाली आंबा त्याच्या गोडपणामुळे खूप प्रसिद्ध आहे. बाजारात त्याची किंमत 150 ते 200 रुपये किलोपर्यंत पोहोचते. ज्यातून या हंगामात चांगला नफा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, नवीन कुमार राय यांना आंबा लागडवडीची ट्रीक चांगली सापडली आहेत. ते सध्या लाखो रुपयांचा नफा मिळवत आहेत.