Monsoon Update : अखेर… मॉन्सून अंदमानात दाखल; पाहा… महाराष्ट्रात कधी करणार प्रवेश?

Monsoon Update Today 20 May 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामान विभागाने (Monsoon Update) वर्तविलेला अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरला असून, नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मॉन्सूनने अंदमान-निकोबार बेटांवर धडक दिली आहे. मॉन्सूनने सध्याच्या घडीला मालदीवचा काही भाग, बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग, निकोबार द्वीप समूह आणि दक्षिण अंदमान समुद्राच्या काही भागापर्यंत मजल मारली आहे. अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून (आयएमडी) जाहीर (Monsoon Update) करण्यात आली आहे.

‘ला निना’ची स्थिती निर्माण होण्याची शक्यता (Monsoon Update Today 20 May 2024)

दरम्यान, सध्याचे पोषक वातावरण पाहता 31 मेपर्यंत मॉन्सून केरळ किनारपट्टीवर, तर 6 ते 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता (Monsoon Update) आहे. यात प्रामुख्याने तीन ते पाच आठवड्यांत ‘ला निना’ची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. ज्यामुळे केरळमध्ये 31 मे, तसेच दक्षिण कोकणात 5 जून रोजी मॉन्सून दाखल होईल आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात 15 जूनपूर्वी मॉन्सून प्रवेश करेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (आयएमडी) वर्तविण्यात आला आहे.

मॉन्सूनच्या प्रवासात अडथळा नाही

दरम्यान, मॉन्सून प्रवास सुरू झाला असून, तो सुरळीतपणे पुढे सरकेल, त्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. बंगालच्या उपसागरात 22 मे पासून कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल आणि मॉन्सूनला ते पोषक ठरेल, असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे. त्यामुळे आता मॉन्सूनच्या पावसाची चातकासारखी वाट पाहून असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही खूपच आनंददायी बातमी मानली जात आहे.

अवकाळी पावसाचे वातावरण कायम

सध्याच्या घडीला अंदमानमध्ये मॉन्सूनचा पाऊस सुरु झाला आहे. याच पार्श्वभूमीवर केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, पंजाब, राजस्थान उत्तर प्रदेश, या राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात सध्या अवकाळी पावसाचे थैमान सुरूच असून, रविवारी दुपारच्या सुमारास पुणे, सिंधुदुर्ग, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात वादळी पाऊस झाला आहे. तर आजही (ता.20) हवामान विभागाने राज्यात प्रामुख्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.