Loksabha Election 2024 : नादखुळा..! लोकसभा निवडणूक कोण जिंकणार? शेतकऱ्याने लावली 11 बुलेटची पैज!

Loksabha Election 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election 2024) पाचवा आणि अंतिम टप्प्या सोमवारी (ता.20) नुकताच पार पडला. सर्वच पाचही टप्प्यातील मतदान आटोपल्याने सर्वांच्याच नजरा 4 जूनच्या लोकसभा निवडणुकीची निकालाकडे लागल्या आहेत. अशातच आता निवडणूक निकालाआधीच कोण जिंकणार? याची चर्चा सर्वच मतदार संघांमध्ये ठिकठिकाणी चांगलीच रंगल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच राज्यातील प्रमुख आणि लक्षवेधी लोकसभा मतदार संघ असलेल्या माढा लोकसभा मतदार संघात निवडणूक (Loksabha Election 2024) कोण जिंकणार? यावरुन एका शेतकऱ्याने चक्क 11 बुलेटची पैज लावल्याचे समोर आले आहे.

काय आहे नेमकी पैज? (Loksabha Election 2024)

आजपर्यंत आपण बऱ्याच पैज ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. मात्र, आपल्या नेत्याच्या वेडापोटी एका शेतकरी कार्यकर्त्याने इतकी भलीमोठी पैज लावल्याने तिची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघाचे (Loksabha Election 2024) उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील जिंकल्यास 11 बुलेटची ही पैज लावण्यात आली आहे. निलेश पाटील या शेतक-याने ही अकरा बुलेटची पैज लावली आहे. ज्याला पैज लावायची आहे, त्याचा उमेदवार निवडून आला तर निलेश पाटील त्याला बुलेट देणार आहेत. मात्र, तुतारीवरचा उमेदवार निवडून आल्यास अर्थात धैर्यशील मोहिते पाटील निवडून आल्यास पैज लावणा-याने पाटील यांना बुलेट द्यायची? अशी ही पैज आहे.

कोण आहेत शेतकरी निलेश पाटील?

निलेश पाटील हे माढा तालुक्यातील बावी गावचे रहिवासी असून, त्यांची स्वतःची सहा एकर द्राक्ष बाग आहे. शरद पवार यांनी वेळोवेळी फळबागांसाठी केलेल्या मदतीची जाणीव त्यांना आहे. माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे पाटील यांनी आता तुतारी चिन्हावर उभे राहिलेले मोहिते पाटील निवडून येणार असल्याचा दावा केला आहे. यासाठी त्यांनी चक्क 11 बुलेटची पैज लावलेली आहे. ज्याला पैज लावायची आहे? त्याचा उमेदवार निवडून आला तर त्याला बुलेट द्यायची आणि तुतारीवरचा उमेदवार निवडून आला तर त्याने पाटील यांना बुलेट द्यायची. असे या पैजेच्या विड्याचे स्वरूप आहे.