Paddy Variety : धानाच्या ‘या’ वाणांची लागवड ठरेल फायदेशीर; हेक्‍टरी 50 क्विंटल उत्पादन!

Paddy Variety For Farmers)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशभरात अनेक भागांमध्ये धान शेती (Paddy Variety) मोठया प्रमाणात केली जाते. धान हे खरीप हंगामातील मुख्य पीक असून, महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकण आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकरी धानाची लागवड करतात. मात्र, धान पिकाला जास्तीचे पाणी आवश्यक असल्याने, अलीकडे भात शेती शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासह कमी पाण्यात येणाऱ्या वाणांची लागवड करणे गरजेचे असते. याच पार्श्वभूमीवर आज आपण कमी पाण्यात येणाऱ्या धानाच्या तीन प्रजातींबद्दल (Paddy Variety) जाणून घेणार आहोत.

‘हे’ आहेत धानाचे तीन प्रमुख वाण (Paddy Variety For Farmers)

पुसा बासमती पीबी 1728 : भारतातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित होणारी ही बासमती तांदळाची एक प्रमुख जात (Paddy Variety) आहे. जिवाणूजन्य रोगामध्ये ही जात प्रतिकारक असल्याचे म्हटले गेले आहे. या वाणाची पेरणी 20 ते 22 जूनपर्यंत केली जाऊ शकते. विशेष म्हणजे 1 एकरात पेरणीसाठी 5 किलो बियाणे पुरेसे ठरते. या जातीपासून शेतकऱ्यांना एकरी 25 क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळते.

पुसा बासमती पीबी 1886 : भाताची ही देखील एक प्रमुख जात आहे. जाणकारांच्या माहितीप्रमाणे पेरणीनंतर साधारणतः 150 ते 155 दिवसांत या जातीचे पीक परिपक्व होत असते. जुनच्या पहिल्या पंधरवड्यात या जातीची पेरणी केल्यास चांगले उत्पादन मिळवता येणे शक्य आहे. या जातीपासून हेक्‍टरी 50 क्विंटल पर्यंतचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकते.

पुसा बासमती पीबी 1509 : कमी पाणी असलेल्या भागात धानाच्या या जातीची लागवड केली तर शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळण्याची शक्यता असते. या जातीपासून एकरी 25 ते 28 क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचे सांगितले जाते. व्यावसायिक भात शेतीसाठी या जातीची लागवड करणे फायदेशीर ठरते. उच्च उत्पादन क्षमता असल्याने आणि या जातीची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असल्याने कमी उत्पादन खर्चात शेतकऱ्यांना अधिकची कमाई करता येणे शक्य आहे.