हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक शेतीमध्ये आपले नशीब (Tomato Farming) आजमावत आहेत. विशेष म्हणजे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये अधिकाधिक उत्पन्न देखील मिळवत आहे. यातही शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देत, भाजीपाला पिकांच्या लागवड करण्यास प्राधान्य देत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी टोमॅटोसह भाजीपाला पिकांच्या लागवडीतून आर्थिक प्रगती साधली आहे. विशेष म्हणजे दुष्काळी परिस्थितीतही चांगले उत्पन्न मिळवल्याने त्यांच्या यशस्वी भाजीपाला शेतीची (Tomato Farming) सर्वदूर चर्चा होत आहे.
शिक्षणानंतर धरली शेतीची वाट (Tomato Farming Farmer Success Story)
अमोल देसाई असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते सांगली जिल्ह्यातील आष्टा तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांची आपली स्वतःची चार एकर शेती आहे. ज्यात ते टोमॅटोची सातत्यपूर्ण शेती करत, एकरी सरासरी पाच लाखांपर्यंत उत्पादन (Tomato Farming) घेत आहे. विशेष म्हणजे शेतकरी अमोल देसाई यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले असून, नोकरीच्या मागे न लागता शेतीची वाट धरली आहे. त्यांनी भाजीपाला शेतीतून आर्थिक प्रगती साधल्याने त्यांच्या आसपासच्या शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या यशस्वी भाजीपाला शेतीची सर्वदूर चर्चा होत आहे.
‘या’ भाजीपाला पिकांची लागवड
शेतकरी अमोल देसाई सांगतात, नोकरीपेक्षा आपण शेतीला प्राधान्य देत सध्या त्यांनी स्वतःबरोबर इतरही शेतकऱ्यांची शेती कसण्यासाठी घेतली आहे. त्यांनी ऊस एक एकर, काकडी दोन एकर, केळी सव्वा एकर तसेच कोबी व फ्लॉवर यासह एक एकर टोमॅटोची लागवड केली आहे. या पिकांना त्यांनी पाणी देण्यासाठी विहीर आणि बोअरवेल घेतला आहे.
किती मिळतोय टोमॅटो दर?
टोमॅटो लागवडीसाठी आपण 30 गुंठे क्षेत्रात उभी, आडवी नांगरट करून त्यांनी शेणखत, कंपोस्ट खत घालून जमीन तयार केली आहे. सरी घेतल्यानंतर 25 फेब्रुवारी रोजी मल्चिंग पेपरच्या साहाय्याने अथर्व जातीच्या टोमॅटोच्या रोपांची लागवड केली. तार व काठीच्या आधाराने रोपे बांधून घेतली. पाण्यासाठी ठिबकचा वापर केला. ठिबकने नियमित खते दिली असून कीटकनाशकाची गरजेनुसार फवारणी केली.
किती मिळतंय उत्पन्न?
दरम्यान, शेतकरी अनिल देसाई यांचा टोमॅटो प्लॉट सुमारे 65 ते 70 दिवसानंतर सुरू झाला आहे. त्यानंतर आता दीड ते दोन महिने प्लॉट चालेल. सध्या आठ ते दहा तोडे झाले असून, दहा किलो टोमॅटोला 150 ते 200 रुपये दर मिळत आहे. सध्या मिळत असलेल्या दरानुसार आपल्याला उन्हाळी टोमॅटो लागवडीतून 30 गुंठ्यात एकत्रिपणे सुमारे चार ते पाच लाखांचे उत्पन्न मिळणार असल्याचे, शेतकरी अमोल देसाई यांनी सांगितले आहे.