हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतकऱ्यांसह शेतीवर आधारित अप्रत्यक्ष उद्योगांना देखील यंदाच्या पावसाळ्याबाबत (Monsoon Update) मोठी उत्सुकता आहे. अशातच आता भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) यंदाच्या मॉन्सूनबाबतचा दुसरा सुधारित अंदाज सोमवारी (ता.27) रात्री उशिरा जाहीर केलेला आहे. यंदाच्या जून ते सप्टेंबर या मॉन्सून काळात राज्यासह देशभरात यंदा सर्वसाधारण म्हणजेच 106 टक्के पाऊस पडण्याचा सुधारीत अंदाज असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. या अंदाजात चार टक्क्यांची (Monsoon Update) कमी अधिक तफावत गृहीत धरण्यात आली आहे.
पहिल्या अंदाजावर शिक्कामोर्तब (Monsoon Update Today 28 May 2024)
जून महिन्यात देशभरात सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. असेही हवामान विभागाने (Monsoon Update) म्हटले आहे. त्यामुळे आता या सुधारित अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, यापूर्वी हवामान विभागाने 15 एप्रिल 2024 रोजी जाहीर केलेल्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजात मॉन्सून काळात देशभरात 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यावर आता दुसऱ्या अंदाजात आयएमडीकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात दमदार पावसाचे संकेत
मॉन्सून हंगामात महाराष्ट्रात यंदा दमदार पावसाचे संकेत आहेत. महाराष्ट्रासह मॉन्सून कोअर झोनमध्ये (Monsoon Update) सरासरीपेक्षा जास्त (106 टक्क्यांपेक्षा अधिक) पाऊस पडण्याची शक्यता आहे. हंगामात महाराष्ट्रात पावसाचे वितरण सर्वदूर चांगले राहणार असल्याचे हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या नकाशात स्पष्ट केले आहे. यातच मराठवाडा आणि लगतच्या भागात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. जून महिन्यात उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग वगळता राज्याच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जूनपासूनच मुसळधार पाऊस
जूनमध्ये एल-निनो निष्क्रिय अवस्थेत जाईल. जुलै ते सप्टेंबर या काळात ला-निना स्थिती सक्रिय होईल. याचा परिणाम म्हणून जून ते जुलै या पहिल्या टप्प्यापेक्षा ऑगस्ट ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासह देशभरात अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जून महिन्यात देशात यंदा सर्वसाधारण पावसाचा (92-108 टक्के) अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दक्षिण द्वीपकल्प, मध्य भारतासह वायव्य आणि ईशान्य भारताच्या काही भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.