Weather Update : 48 तासांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार? ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता!

Weather Update Today 3 June 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केरळमध्ये अडखळलेला मान्सून रविवारी (ता.2) कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात दाखल (Weather Update) झाला आहे. त्यामुळे पश्चिमी वाऱ्यांनी वेग घेतला आहे. अशातच आता येत्या 48 ते 72 तासांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (आयएमडी) वर्तवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात पुढील 3 दिवस तुफान पावसाचा इशारा (Weather Update) कायम राहणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.

पूर्व मोसमी पाऊस कोसळणार (Weather Update Today 3 June 2024)

सध्या अरबी समुद्रातून राज्याकडे येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग वाढला आहे. त्यामुळे आजपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हा पाऊस 5 जूनपर्यंत सुरू राहील असेही सांगण्यात आले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील तापमानात घट झाली असून, पूर्व मोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आजपासून पुढील दोन ते तीन दिवस पुण्यात वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळतील. पुण्यासोबत, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भ-मराठवाड्यातही पावसाची शक्यता

याउलट मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा अलर्ट (Weather Update) जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात येत्या 5 जूनपर्यंत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतील. तर दुसरीकडे विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह उपनगरात सोमवारपासून ढगाळ वातावरण राहील. यंदा मुंबईत पावसाचे आगमन वेळेवर होणार असून, पावसाचे प्रमाणदेखील समाधानकारक असणार आहे. येत्या 6 ते 13 जूनपर्यंत मान्सून पूर्णत: मुंबईत दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.