पावसाचा लपंडाव ! पेरणीबाबत शेतकरी साशंक, जाणून घ्या कृषी विभागाचा मोलाचा सल्ला

farmer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : यंदा राज्यात मान्सून वेळे आधीच हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद दिसून येत आहे. मृग नक्षत्राच्या पेरण्या देखील राज्याच्या अनेक भागात सुरु आहेत. मात्र मागील २ दिवसांपासून राज्यात पावसाचा लपंडाव सुरु आहे. काही भागात पावसाच्या सारी तर काही भागात केवेळ ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

कसे असेल हवामान ?

हवामान विभागाचे तज्ज्ञ के . एस . होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही तासांपासून मुंबईत पाऊस नाही. ठाण्याच्या आसपास मात्र कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सारी कोसळल्या आहेत. गोवा , कोकण किनारपट्टी आणि कर्नाटक किनारपट्टीवर पावसाळी हवामान कायम राहणार आहे. मागील काही तासांपासून मुंबईमध्ये पाऊस नाही. आज सोमवारी आणि मंगळवारी देखील अशीच स्थिती मुंबईमध्ये पाहायला मिळेल असा अंदाज हवामान विभागाच्या होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे.

काय आहे कृषी विभागाचा सल्ला ?

शक्यतो ८० ते १०० मिलीमीटर पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी शेती करण्याचा सल्ला कृषिविभागाकडून दिला जातो. त्यामुळे जमिनीमधीला ओलावा टिकून राहतो. आणि पावसात खंड पडला तरी पिकांना ओलावा मिळतो. त्यामुळे ८०-१०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. मुख्यतः कापूस ,सोयाबीन अशा कोरडवाहू पिकांसाठी हा सल्ला देण्यात आला आहे. बऱ्याचवेळा पाऊस लांबला की दुबार पेरणीचे संकट ओढवते त्यामुळे हा सल्ला देण्यात आला आहे. कोकणत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांनी कीटकनाशके ,खते ,बुरशीनाशके यांची फवारणी पुढे ढकलावी. भात पिकाची पेरणी , आंबा ,फणस या झाडांची लागवड पुढे ढकलावी. आंबा, काजू, नारळ सुपारीची जुनी कलम मोडू नये म्हणून त्यांना आधार द्यावा. मध्यमहाराष्ट्रातील शेतकऱयांनी सोयाबीन ,तूर ,मका आदी पिकांच्या वाणांची निवड करावी. या ठिकाणी पुढील ३ दिवस माध्यम ते तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कापूस सोयाबीन साठी पूर्वमशागतीची कामे करून घ्यावीत. केळीच्या झाडांना आधार द्यावा. मिरची पिकावर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे त्यामुळे कीड नाशकांची फवारणी करावी.