हॅलो कृषी ऑनलाईन :गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडीप असताना राज्यात अनेक भागात ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. उद्या कोकणात सर्वदूर विदर्भात काही ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.
5 Aug,
Pune District rainfall in last 24 hrs today morning.
Moderate to near heavy spells in Ghat Areas of District observed.
Light rain in morning hrs towards city side. Partly cloudy Sky in morning. pic.twitter.com/Xpd2s9NGXD— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 5, 2021
उत्तर बंगालचा उपसागर आणि परिसरात चक्रिय वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून 5.8 किलो मीटर उंचीवर आहे. उत्तर भारतातील वायव्य मध्य प्रदेशात हवेचे ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून त्याची तीव्रता कमी होण्याचे संकेत आहेत. मान्सूनचा असलेल्या कमी दाबाचा पट्टा राजस्थानचा जैसलमेर पासून कमी दाब क्षेत्राच्या केंद्रांमधून बांगलादेश अरुणाचल प्रदेश कडे आहे.
मान्सूनचा आज उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य प्रदेश राजस्थान मध्ये दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातचा किनाऱ्यालगत जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी सह मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. तर विदर्भात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी सह पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे