आनंदवार्ता …! संपूर्ण देशात सप्टेंबर मध्ये चांगल्या पावसाची शक्यता ; जाणून घ्या राज्यात कशी असेल स्थिती ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: मॉन्सूनचा अखेरच्या टप्प्यात सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या तुलनेत 110 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने बुधवारी जाहीर केला. नवी दिल्ली येथे एक पत्रकार परिषद ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सप्टेंबर महिन्यातील मान्सूनच्या पावसाचा अंदाज यामध्ये जाहीर केला.

1961 ते 2010 या कालावधीत दीर्घकालीन सरासरीचा विचार करता सप्टेंबर महिन्यात देशात 170 मिलिमीटर पाऊस पडतो. जून ते ऑगस्ट या कालावधीत देशात सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडला असून सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे हंगामातील पाऊस सरासरी गाठेल असंही यावेळी स्पष्ट करण्यात आले. सप्टेंबर महिन्यात मध्य भारतात सरासरीपेक्षा अधिक ते सरासरी इतक्या पावसाची शक्‍यता आहे तर वायव्य भारत ईशान्य भारत आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.पुढील चार ते पाच दिवसात बंगालच्या उपसागरात कमी हवेच्या दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात कसा असेल पाऊस ?
महाराष्ट्राचा विचार करता सप्टेंबर मध्ये महाराष्ट्रात पावसाचा प्रमाण कसे राहील याविषयी प्रश्नाला उत्तर देताना डॉक्टर मृत्यूंचे महापात्रा म्हणाले कमी क्षेत्रावरील अंदाज वर्तवणं आव्हानात्मक आहे महाराष्ट्रातील कोकण घाटमाथा विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता आहेच मात्र अंतर्गत मध्य महाराष्ट्रात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे असं ते म्हणाले. मध्य भारतात चांगल्या पावसाचे संकेत असून महाराष्ट्राचा विचार करता विदर्भ कोकण घाटमाथा मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक तर मध्य महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात सरासरी पेक्षा कमी पावसाची शक्यता आहे जाहीर केलेल्या नकाशानुसार आतापर्यंत प्रमाण कमी असलेला मध्य महाराष्ट्रातील भागात सप्टेंबरमध्ये हे पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे.