राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता , मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला सुरुवात झाली आज 22 रोजी विदर्भ, मराठवाडा, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार वारे मेघगर्जना आणि पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पावसाचा जोर वाढणार

मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर पासून कोटा, रांची, कमी दाबाचे क्षेत्र केंद्र व बंगालच्या उपसागरात पर्यंत विस्तारलेला आहे. पूर्व राजस्थान परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. कमी दाबाच्या क्षेत्राचा पासून तेलंगणा पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांमुळे पश्चिम बंगाल आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाला आहे. त्या लगत समुद्रसपाटीपासून 5.8 किलो मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात शनिवार पर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होणार असून पूर्व किनाऱ्याकडे येणाऱ्या या प्रणालीमुळे पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे.

आज या भागात पाऊस

आज कोकण, विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्रात, बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात, अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज असून जोरदार वाऱ्यासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

या भागाला यलो अलर्ट

मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, नंदुरबार, धुळे, जळगाव, सोलापूर, मराठवाडा, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, जालना,, विदर्भातील, नागपूर, भंडारा, वर्धा आणि चंद्रपूर या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.