हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या गुलाब चक्रीवादळाचे महाराष्ट्रातून गुजरात राज्यात मार्गक्रमण झाले आहे आज दिनांक 30 रोजी ही प्रणाली पुन्हा तीव्र होणार आहे. तर उद्या दिनांक 1 ऑक्टोबर रोजी अरबी समुद्रात चक्रीवादळांची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. पश्चिमेकडून सरकून जाणाऱ्या या प्रणालीमुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनार्यालगत अरबी समुद्रात जोरदार वाऱ्यासह उंच लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले गुलाब चक्रीवादळ रविवारी दिनांक 26 रोजी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनार्यावर धडकले हे चक्रीवादळ आंध्र तेलंगाना महाराष्ट्राच्या मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातून गुजरात कडे निघून गेले. बुधवारी दिनांक 29 रोजी सकाळी ठळक कमी दाबाचे क्षेत्र असलेली प्रणाली दक्षिण गुजरात आणि खंबायतच्या आखातात मध्ये सक्रिय होती. आज दिनांक 30 रोजी अरबी समुद्राकडे केल्यानंतर ही प्रणाली पुन्हा तीव्र होण्याचे संकेत आहेत.
Depression ovr NE Arabian Sea & adjoining Kutch,abt 60km WNW Devbhoomi Dwarka (Gujarat),280 km ESE of Karachi (Pakistan),860 km ESE of Chabahar Port (Iran)
Deep Depression nxt 12hrs
Cyclonic Storm in subsequent 24hrs
To mve WNW Pakistan-Makran coast,going away frm Indian coast pic.twitter.com/slzWcRjBM0— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 30, 2021
याच्या परिणाम स्वरूप अरबी समुद्रातील प्रणालीमुळे दोन दिवस उंच लाटा उसळणार असून 55 ते 65 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. आज दिनांक 30 रोजी गुजरात आणि उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर ही प्रणाली भारतीय किनार्यापासून दूर पाकिस्तान आणि मकरान किनाऱ्याकडे जाणार असल्याने महाराष्ट्राला ह्या प्रणालीचा प्रभाव जाणवणार नाही