येत्या 3-4 दिवसात राज्यातल्या काही भागात गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता

rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी राज्यात पावसाचे चक्र हे असमान राहिले आहे.  कधी कमी पाऊस तर कधी महापूर अशी अवस्था राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाहायला मिळली. दरम्यान येत्या ३-४ दिवसात राज्यातल्या काही भागात गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. याबाबतची माहिती हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

आज सकाळी ९ वाजता मिळालेल्या अपडेट नुसार कर्नाटक, गोवा, केरळ च्या किनारपट्टीवर ढग दाटून आले आहेत. तसेच राज्यातील कोकण, तसेच मराठवाड्याच्या काही भागावर देखील ढग दाटून आले आहेत. म्हणजेच या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

‘या’ भागाला यलो अलर्ट

९ ऑक्टोबर – आज दिनांक ९ ऑक्टोबर रोजी राज्यातील जळगाव, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक या भागाला हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

१०ऑक्टोबर – दिनांक 10 ऑक्टोबर म्हणजेच उद्या राज्यातल्या नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, आणि लातूर या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

११ ऑक्टोबर – दिनांक ११ रोजी राज्यातील पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुन्हा चक्री वादळाचा धोका

भारताला यावर्षी यास , तोतै ,गुलाब अशा चक्रीवादळाचा अधिकच फटका बसला आहे. याचा राज्याला मोठा फटका बसला आहे . आता पुन्हा एकदा आणखी एक चक्रीवादळ येण्याचा धोका संभवतो आहे. याबाबतची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. येत्या १० ऑक्टोबरला आंदामानजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून त्यानंतर ओडिसा आणि उत्तर आंध्र प्रदेश कडे ते सरकेल असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही. मात्र मागे आलेली चक्रीवादळ अशाच कमी दाबाच्या क्षेत्रातून निर्माण झाली आहेत. आताही असेच चक्रीवादळ निर्मण होण्याची भीती काही हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे .